किडनी रुग्णांसाठी शिबिराचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किडनी रुग्णांसाठी
शिबिराचे आयोजन
किडनी रुग्णांसाठी शिबिराचे आयोजन

किडनी रुग्णांसाठी शिबिराचे आयोजन

sakal_logo
By

किडनी रुग्णांसाठी
शिबिराचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी, ता. २० : जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे उद्या (ता. २१) सकाळी अकराला जागतिक किडनी दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त किडनीच्या रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व तपासणी कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सध्या सर्वत्र तरुण वयातील व्यक्तींमध्ये किडनीचे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच वयस्करांमध्येही रक्तदाब, मधुमे तसेच इतर गंभीर आजारांमुळे किडनीचे आजार होत आहेत. या आजारावर किडनी बदलणे व किडनी डायलेसिस आदी औषधोपचार केले जातात. या आजारासाठी जागतिक किडनी दिन सर्वत्र राबविण्यात येतो. उद्या सकाळी ११ वाजता जिल्हा रुग्णालयाच्या आनंदीबाई जोशी सभागृहात किडनीच्या रुग्णांकरिता तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व तपासणी कार्यक्रम आयोजित केला आहे. इच्छुक किडनीच्या आजाराचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98145 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..