जेसीबीच्या धडकेत एसटीची हानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेसीबीच्या धडकेत एसटीची हानी
जेसीबीच्या धडकेत एसटीची हानी

जेसीबीच्या धडकेत एसटीची हानी

sakal_logo
By

51535
सावंतवाडी ः जेसीबीची धडक बसून एसटीचे झालेले नुकसान.

जेसीबीच्या धडकेत एसटीची हानी

सावंतवाडीतील घटना; वळणाचा अंदाज न आल्याने अपघात

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः वळणाचा अंदाज न आल्यामुळे जेसीबीची एसटी बसला जोरदार धडक बसून अपघात झाला. ही घटना आज सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास येथील उपरलकर देवस्थान परिसरात घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही; मात्र बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित एसटी बस बावळाट येथून सावंतवाडीच्या दिशेने येत होती. त्यामध्ये तब्बल ३० हून अधिक प्रवासी होते. उपरलकर देवस्थान परिसरातील एका अवघड वळणावर समोरून येणाऱ्या जेसीबीने एसटीला जोरदार धडक दिली. यात एसटीच्या साईडपत्र्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने चालकासह आतील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातानंतर झालेल्या मोठ्या आवाजामुळे सर्वच प्रवाशांची भीतीने गाळण उडाली. याबाबत पोलिसांत उशिरापर्यंत कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती. दरम्यान, जेसीबीचे समोरील बकेट एसटीच्या पत्र्यात घुसल्यामुळे मोठे नुकसान झाले. तर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडी आगारातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98175 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..