फुफ्फुसात पाणी गेल्याने पर्यटकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुफ्फुसात पाणी गेल्याने पर्यटकाचा मृत्यू
फुफ्फुसात पाणी गेल्याने पर्यटकाचा मृत्यू

फुफ्फुसात पाणी गेल्याने पर्यटकाचा मृत्यू

sakal_logo
By

फुफ्फुसात पाणी
गेल्याने बेळगावच्या
पर्यटकाचा मृत्यू
वेंगुर्ले, ता. २० ः शिरोडा-वेळागर येथे पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा समुद्र स्नान करताना
फुफ्फुसात पाणी गेल्याने आज मृत्यू झाला. विनायक अशोक पावले (वय ४५, रा. टिळकवाडी, बेळगाव) असे त्यांचे नाव आहे. याबाबतची वर्दी त्याच्या सोबत पर्यटनासाठी आलेले श्रावण संतोष शिरवलकर (रा. खानपूर रोड, बेळगाव) यांनी वेंगुर्ले पोलिसांत दिली. त्यानुसार येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरोडा-वेळागर येथे पर्यटनासाठी चौघे जण बेळगाववरून आले होते. सोमवारी (ता.१९) रात्री साडेआठला वेळागर येथील समुद्राच्या पाण्यात त्या सर्वांनी अंघोळ केली व ते बाहेर आले. त्यानंतर मित्र विनायक पावले याला छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागल्याने तो आराम करून जेवणासाठी आला व टेबलावर झोपला; परंतु त्याला उठविण्यास गेले असता त्याची काहीच हालचाल होत नसल्याने दिसले. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे रात्री साडेनऊच्या सुमारास दाखल केले. मात्र, यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. समुद्राचे पाणी फुफ्फुसामध्ये गेल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक निष्कर्ष वैद्यकीय सूत्रांनी पोलिसांना दिला. याप्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षक आर. व्ही. दळवी तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98180 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..