युवकहो, व्यसनांपासून दूर राहा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवकहो, व्यसनांपासून दूर राहा!
युवकहो, व्यसनांपासून दूर राहा!

युवकहो, व्यसनांपासून दूर राहा!

sakal_logo
By

51591
51592
कणकवली : येथील कॉलेजमधील कार्यक्रमात बोलताना पोलिस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे. यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले. दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित विद्यार्थी.


युवकहो, व्यसनांपासून दूर राहा!

राजकुमार मुंढे : शाळा, कॉलेज परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री झाल्यास कारवाई

कणकवली, ता.२१ : तंबाखूमुळे शरीराला फायदे होण्यापेक्षा तोटेच अधिक आहेत. कर्करोगासह हृदयविकारासह अन्य आजार देखील निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे युवा पिढीने व्यसनांपासून दूर राहावे. तसेच शाळा, महाविद्यालयीन परिसराच्या आसपास देखील तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असली तर पोलिसांना माहिती द्या यासंदर्भात निश्चितच कारवाई केली जाईल, अशी ग्‍वाही कणकवली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्रकुमार मुंढे यांनी केले.
येथील कणकवली महाविद्यालयात विविध प्रकारच्या व्यसनापासून तरूणाईला दूर ठेवण्याबाबतचा मार्गदर्शन कार्यक्रम झाला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक श्री.मुंढे बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले उपस्थित होते. श्री.मुंढे म्‍हणाले, ‘‘शाळा, कॉलेजांच्या १०० यार्ड परिसरात जर तंबाखूजन्य पदार्थांचे बॅनर लागले किंवा विक्री होत असेल तर पोलिसांना वाळविल्यास याची कारवाई केली जाते. तरुण पिढीने याबाबत सजग राहिले पाहिजे. तसेच तरुण पिढी वाहनांचे नियम पाळताना अनेकदा दुर्लक्ष करताना दिसते. त्‍यामुळे अपघातांची संख्याही वाढत आहे. वाहन चालवताना नियम पाळण्याची गरज आहे. ट्रिपल सीट दुचाकी चालवणे टाळले पाहिजे. हेल्मेटचा सर्रास वापर करा, त्याचसोबत चार चाकी मधून जाताना सीटबेल्ट अनिवार्य असला पाहिजे.’’
---
...तर पोलिसांना माहिती द्या
मोबाईल चे फायदे व तोटे या संदर्भात देखील यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. मोबाईल वापरत असताना तरुणांनी त्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सोशल मीडियाचा वापर करत असताना जबाबदारीचे भान राखा. त्याचसोबत अकाउंट हॅक होण्याचे प्रकार घडल्यास तत्काळ संबंधित पोलिस स्टेशनला माहिती द्या, असे आवाहन श्री.मुंढे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98251 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..