कदमांनी शिवसेनेला डिवचू नये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कदमांनी शिवसेनेला डिवचू नये
कदमांनी शिवसेनेला डिवचू नये

कदमांनी शिवसेनेला डिवचू नये

sakal_logo
By

51620
सावंतवाडी ः येथे रामदास कदम यांच्या विरोधात आंदोलन करताना शिवसैनिक.

कदमांनी शिवसेनेला डिवचू नये

रुपेश राऊळ ः सावंतवाडीत शिवसेनकडून निषेध आंदोलन

सावंतवाडी, ता. २१ ः राज्यात गद्दारांचे सरकार आले आहे. शिंदे गट हे भाजपचे एक पिल्लू आहे. त्यांच्यातीलच एका रड्या आमदाराला ठाकरे घराण्यावर बोलणे शोभत नाही. रामदास कदम यांनी ठाकरेंविरोधात बेताल वक्तव्य करून अशांतता माजवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, कदमांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करू नये. शिवसैनिकांचा उद्रेक झाल्यास त्याला शासनच जबाबदार राहील, असा इशारा तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे दिला. ठाकरे घराण्याविरोधात बेताल व्यक्तव्य करणाऱ्या शिंदे गटातील आमदार कदम यांचा आज सावंतवाडीत शिवसेनेकडून निषेध करण्यात आला. यावेळी निषेध बॅनरवरील प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या समोर हे आंदोलन झाले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शिवसेना नेते बाळा गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, शब्बीर मणियार, वेत्ये उपसरपंच गुणाजी गावडे, अपर्णा कोठावळे, रश्मी माळवदे, श्रुतिका दळवी, सुनिता राऊळ, गितेश मुळीक, राजू शेटकर, प्रगती बामणे, शिवदत्त घोगळे, संदीप गवस, नामदेव नाईक, समीरा खलीब, सचिन पालक, संतोष मेस्त्री, चंद्रकांत गावडे, रामचंद्र कुबल, मंगेश धुरी, अनिषा चिले, नंदा सावंत, अर्चना बोंद्रे, श्रेया कासार, मनाली परब, राजू कुबल, प्रकाश सनाम, सुनिल गावडे आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
आमदार कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्याविरोधात एका कार्यक्रमात बेताल वक्तव्य केले. त्याच्या निषेधार्थ आज सावंतवाडीत हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी बोलताना श्री. राऊळ म्हणाले, ‘‘शिंदे गटातील आमदार कदम शिवसेना पक्षप्रमुखांवर बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांच्याकडून शिवसेनेला डिवचन्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे राज्यात अशांत पसरण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामागे पूर्णपणे भाजपाचा हात आहे. भाजप शिंदे गटाला पुढे करून घाणेरडे राजकारण करत आहे. वाढत्या महागाईला भाजपच जबाबदार आहे. त्यामुळे त्यांना जनताच धडा शिकवेल.’’
---
शिवसेनेला फरक पडत नाही
श्री. कासार म्हणाले, ‘‘कदमांनी स्वतःला आवर घालावा. शिवसैनिक कोणाला घाबरणार नाहीत, हा प्रकार पुन्हा घडल्यास जशास तसे उत्तर देऊ. शिवसैनिक शांत आहेत. त्यांना कोणी डिवचू नये, अन्यथा शिवसैनिकांच्या उद्रेकाला शासन जबाबदार राहील. यापूर्वी शिवसेनेमुळेच दीपक केसरकर हेही आमदार आणि मंत्री झाले आहेत. मात्र, ते विसरून त्यांनी मंत्रिपदासाठी गद्दारी केली. ४० गद्दार आमदारांनी कितीही टीका केली तरी शिवसेनेला काही फरक पडणार नाही.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98271 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..