सावंतवाडीचा जलतरण तलाव सुरू होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीचा जलतरण तलाव सुरू होणार
सावंतवाडीचा जलतरण तलाव सुरू होणार

सावंतवाडीचा जलतरण तलाव सुरू होणार

sakal_logo
By

सावंतवाडीचा जलतरण तलाव सुरू होणार

पालिकेचे पत्र; भोगटेंचे आंदोलन स्थगित


सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. 31 ः शहरातील जिमखाना मैदान येथील जलतरण तलाव नूतनीकरण करूनही बंद अवस्थेत असल्याने माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी आवाज उठवत पालिका प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर याची दखल घेत पालिका प्रशासनाने संबंधित जलतरण तलाव सुरू करण्याबाबत सकारात्मकता दर्शवत तसे लेखी पत्र श्री. भोगटे यांना दिल्याने पुकारण्यात आलेले आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती श्री. भोगटे यांनी दिली.
शहरातील जलतरण तलाव गेले कित्येक वर्ष बंद आहे. या तलावाला निधी खर्च करून नूतनीकरण करण्यात आले आहे. परंतु, असे असले तरी हा तलाव बंद आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना जलतरणासाठी खाजगी जलतरणाचा अवलंब करावा लागत आहे. परिणामी यासाठी वेळ व पैसाही वाया जात आहे. एकूणच शहरात असलेला हा तलाव पालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन लवकरात लवकर सुरू करावा, जेणेकरून शहरातील नागरिकांना याचा लाभ मिळू शकेल. अन्यथा नागरिकांसाठी आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक असलेल्या श्री. भोगटे यांनी दिला होता. त्याबाबतचे निवेदनही त्यांनी पालिका प्रशासनाला दिले होते. अखेर श्री. भोगटे यांच्या इशाऱ्यानंतर पालिका प्रशासनाने जलतरण तलाव सुरू करण्यासंदर्भात टेंडर प्रक्रिया राबवण्यात येईल तसेच लवकरात लवकर हा तलाव सुरू करण्यात येईल, असे लेखी पत्र श्री. भोगटे यांना दिले आहे.
-----------
51622
जलतरण तलाव सुरू करण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाकडून मिळाले आहे. त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. पालिकेच्या विनंतीचा मान ठेवून आंदोलन मागे घेत आहे.
- सुरेश भोगटे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98273 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..