बांधकाम कामगारांना सदैव सहकार्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकाम कामगारांना सदैव सहकार्य
बांधकाम कामगारांना सदैव सहकार्य

बांधकाम कामगारांना सदैव सहकार्य

sakal_logo
By

51627
पेंडुर ः शासनाच्या कला कौशल्य उपक्रमांतर्गत बांधकाम कामगारांना दाखल्यांचे वितरण करताना बाबल नांदोसकर.

बांधकाम कामगारांना सदैव सहकार्य

बाबल नांदोसकर ः पेंडुर येथील प्रशिक्षणात दाखल्यांचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ ः बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक बांधकाम कामगाराने घेतला पाहिजे. त्यासाठी आम्ही निश्चितच सहकार्य करू, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघाचे जिल्हाध्यक्ष बाबल नांदोसकर यांनी केले.
बांधकाम कामगार कल्याणकारी संघ सिंधुदुर्ग या संघटनेच्या माध्यमातून पेंडुर (ता. मालवण) येथे भारत सरकारच्या स्किल इंडिया कला कौशल्य उपक्रमाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी कामगारांना स्किल इंडियातर्फे सर्टिफिकेटचे वाटप पेंडुर ग्रामपंचायत येथे करण्यात आले. पेंडुरचे सरपंच व बांधकाम कामगार संघाचे सचिव रवींद्र साळकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी पेंडुर विभाग अध्यक्ष रमेश म्हापणकर, सचिव रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष नांदोसकर यांनी कामगारांना भविष्यात उद्भवणारी संकटे व पुढील वाटचाल याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले, "गेली दोन वर्षे कोरोना महामारी संकटामुळे बांधकाम कामगारांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. बांधकाम कामगारांचे प्रश्‍न शासन दरबारी सुटावेत, यासाठी संघटनेच्या माध्यमातून आमदार, खासदार, पालकमंत्री, राज्याचे कामगार मंत्री, यांचे लक्ष वेधले. त्यांच्या माध्यमातून आम्ही उपस्थित केलेले प्रश्न मार्गी लागत असून ही निश्चितच बांधकाम कामगारांसाठी कौतुकास्पद बाब आहे.’’ यावेळी बांधकाम क्षेत्रातील अनेक प्रश्न, ऑनलाइन मार्गदर्शन तसेच नोंदणी आदी सर्व प्रकारची माहिती देण्यात आली. कामगारांना उद्भवणाऱ्या समस्या व संघटनेच्या माध्यमातून केले जाणारे प्रयत्न याबाबत माहिती देण्यात आली.
--
चौकट
संघटितपणा कायम जोपासा
नांदोस्कर म्हणाले की, ‘‘बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या योजना कामगारांनी समजून घेतल्या पाहिजेत. त्याचा लाभ कसा मिळेल, यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. एखादा प्रश्न सोडवायचा असेल, तर पाठपुरावा महत्त्वाचा आहे. यासाठी आम्ही निश्चितच मदतीसाठी कटिबद्ध आहोत. कोणतेही प्रश्न सोडविताना संघटितपणा फार महत्वाचा आहे. हा संघटितपणा कायम जोपासा.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98278 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..