कृषी विभागामार्फत ८३ लाख निधीची तरतूद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी विभागामार्फत ८३ लाख निधीची तरतूद
कृषी विभागामार्फत ८३ लाख निधीची तरतूद

कृषी विभागामार्फत ८३ लाख निधीची तरतूद

sakal_logo
By

51666

कृषी विभागामार्फत ८३ लाख निधीची तरतूद

विविध योजना; २८ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव देण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनागरी, ता. २१ ः जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत २०२२-२३ मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी ८३ लाख निधीची अंदाजपत्रकात तरतूद केली आहे. या निधीतून जिल्ह्यातील सुमारे १३६७ हुन अधिक लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी पात्र लाभार्थींकडून २८ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले आहेत. २ ऑक्टोबरला प्राप्त प्रस्तावांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी अधिकारी सुधीर चव्हाण यांनी आज दिली.
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी २०२२-२३ साठी ८३ लाख निधीची तरतूद करण्यात आली असून या योजनांचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थी शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी २८ सप्टेंबरपर्यंत सर्व योजनांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
---
जि. प. कृषीच्या योजना, निधी
*योजना *निधीची तरतूद
*कीटकनाशके *२ लाख
*पोर्टेबल पावर स्पेअर *१० लाख
*नॅपसॅक स्पेअर *२ लाख
*ग्रास कटर *४२ लाख
*प्लास्टिक ताडपत्री *५ लाख
*प्लास्टिक क्रेट *३ लाख
*नारळ शिडी *२ लाख
*डिझेल इंजिन *४ लाख
*विद्युत पंप ८ लाख
*पीव्हीसी पाईप *३ लाख
*‘वणवा अर्थसहाय्य’ *२ लाख
--
‘मिशन वासल्य’ही कार्यन्वित
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी ८३ लाख निधीची तरतूद आहे. या सर्व योजनांचा जिल्ह्यातील १३६७ हून अधिक पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. या योजनांचा लाभ देताना कोरोनाबाधित मृत व्यक्तींच्या वारसदारांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी ‘मिशन वासल्य’ योजना कार्यान्वित केली आहे.
----------
कोट
जिल्ह्यातील शेतकरी लाभार्थ्यांनी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात, आवश्यक दाखले व कागदपत्रांच्या पूर्ततेसह २८ सप्टेंबरपूर्वी प्रस्ताव सादर करावेत.
- सुधीर चव्हाण, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98285 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..