रत्नागिरी जिल्ह्यातील 308 घरगुती व 2 सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी  जिल्ह्यातील 308 घरगुती व 2 सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन
रत्नागिरी जिल्ह्यातील 308 घरगुती व 2 सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन

रत्नागिरी जिल्ह्यातील 308 घरगुती व 2 सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन

sakal_logo
By

rat२१p१.jpg
51599
रत्नागिरीः शहर पोलिस ठाण्यातील मानाचा २१ दिवसांच्या गणपतीचे मोठ्या उत्साहात ढोलताशांच्या गजरात विसर्जन झाले.
-------
जिल्ह्यातील ३०८ घरगुती, दोन सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ ः वर्षभर ज्याच्या आगमनाची आतुरता लागून राहते त्या गणपतीबाप्पांची भाद्रपद चतुर्थीला प्रतिष्ठापना सर्वत्र करण्यात आली होती. दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, नऊ दिवस, दहा दिवसाचा उत्सव साजरा करून बहुतांश गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते; मात्र काही ठिकाणी मानाचे व नवसाचे २१ दिवसांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. जिल्ह्यातील ३०८ घरगुती व २ सार्वजनिक गणेशमूर्तींचे मंगळवारी (ता. २०) विसर्जन करण्यात आले.
भाद्रपद चतुर्थीला एक लाख ६५ हजार गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सलग दोन वर्ष कोरोना निर्बंध असल्याने उत्सव शांततेत साजरा करण्यात आला; मात्र यावर्षी निर्बंधमुक्त करण्यात आल्याने उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवात श्री सत्यनारायण महापूजा, सहस्त्रनाम, अथर्वशीर्ष, भजन, आरती आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी मुंबईकरही मोठ्या संख्येने उत्सवासाठी गावी आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जाखडीनृत्य, टिपरीनृत्य आदी कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. काही भाविकांकडून २१ दिवस नवसाचे किंवा मानाच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गणरायाची मनोभावे सेवा करून गणपतीबाप्पांना निरोप देण्यात आला. ढोलताशा पथक, बेंजोच्या तालावर गणेशमूर्तींची सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. विसर्जन घाटावर निरोपाची आरती झाल्यानंतर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
रत्नागिरी शहर पोलिस ठाणे हद्दीत ४ घरगुती व एक सार्वजनिक, ग्रामीणमध्ये १३ घरगुती, जयगड २९, संगमेश्वर १५०, राजापूर ७६, नाटे १३, देवरूख येथे एक सार्वजनिक, गुहागर येथे दहा घरगुती, दापोली १ घरगुती, पूर्णगड ९ व दाभोळचे ३ मिळून अशा एकूण ३०८ घरगुती व दोन सार्वजनिक गणेशमूर्तींना निरोप देण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98288 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..