अन्न परवाना नोंदणीकृत असणे गरजेचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अन्न परवाना नोंदणीकृत असणे गरजेचे
अन्न परवाना नोंदणीकृत असणे गरजेचे

अन्न परवाना नोंदणीकृत असणे गरजेचे

sakal_logo
By

अन्न परवाना नोंदणीकृत असणे गरजेचे

प्रसाद पारकर ः व्यापाऱ्यांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २० ः अन्न व्यवसाय चालकाने कोणताही अन्न व्यवसाय सुरू करण्यापूर्वी भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण परवाना किंवा नोंदणी प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे. याअनुषंगाने व्यापाऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केले.
याबाबत श्री. पारकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, अन्न व्यवसाय चालकांची संख्या खूप मोठी असून कोणत्याही अन्न व्यवसाय चालकाचा भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण अंतर्गतचा परवाना किंवा नोंदणी क्रमांक सहजपणे उपलब्ध होत नाही. कोणतीही विश्वासार्ह नियामक रचना एका मजबूत ग्राहक तक्रार प्रणालीवर अवलंबून असते. पॅकबंद केलेल्या अन्नपदार्थांच्या लेबलवर परवाना क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे. परंतु, अन्न आस्थापनांचा परवाना क्रमांक ग्राहकांना सहजपणे उपलब्ध न होण्याची समस्या विशेषतः रेस्टॉरंट, मिठाईची दुकाने, केटरर्स, किरकोळ दुकाने इत्यादी अन्न आस्थापनाच्या बाबतीत आहे. रेस्टॉरंटच्या बाबतीत प्रमुख ठिकाणी नेहमी ‘अन्न सुरक्षा प्रदर्शनीय फलक'' अनिवार्य आहे. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या ३० सप्टेंबर २०२१ च्या आदेशान्वये सर्व अन्न व्यवसाय चालकांना त्यांचा १४ अंकी परवाना क्रमांक बिलावर नमूद करणे जानेवारी २०२२ पासून बंधनकारक केलेले आहे. कोणत्याही तक्रारीच्या बाबतीत ग्राहक विशिष्ट खाद्य व्यवसाय चालकाविरुद्ध ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतो. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सुचनांबाबत सर्व संबधित व्यापारी संघटनांनी बैठक घेऊन जागृतीचे कामकाज प्रशासनाकडून करण्यात येते. अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे कार्यालयाने कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यात अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या आदेशाच्या अनुषंगाने जानेवारी २०२२ पासून विशेष मोहीम राबविण्यात येत असून यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे.
---
...तर संपर्क साधा
अन्न सुरक्षा व मानके कायद्याचा प्रमुख उद्देश जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हा असून त्यासाठी अन्न व औषध प्रशासन नेहमीच कटिबद्ध आहे. कोणत्याही अन्न आस्थापनाबाबत आणि किंवा अन्नपदार्थांचा ‘दर्जा व गुणवत्ता'' याबाबत कोणतीही शंका असल्यास प्रशासनाशी संपर्क साधण्याबाबत कोकण विभाग (ठाणे) सह आयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांनी जनतेस आवाहन केलेले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98293 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..