कुडाळ-निवती बंदर बसफेरीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळ-निवती बंदर
बसफेरीची मागणी
कुडाळ-निवती बंदर बसफेरीची मागणी

कुडाळ-निवती बंदर बसफेरीची मागणी

sakal_logo
By

कुडाळ-निवती बंदर
बसफेरीची मागणी
वेंगुर्ले ः कोरोना व त्यानंतर एसटी संप कालावधीत बंद करण्यात आलेल्या कुडाळ - निवती बंदर, वेंगुर्ले-निवती बंदर या सर्व एसटी फेऱ्या सुरू करण्यात आल्या; मात्र पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेली सायंकाळी कुडाळहून ४.२० ला सुटणारी कुडाळ-निवती बंदर परतीची शालेय बसफेरी अद्यापही सुरू केलेली नाही. पाट हायस्कूलचे पाचवी ते दहावीचे वर्ग सायंकाळी ४.४५ ला सुटतात. विद्यार्थी पाचपर्यंत म्हापण तिठ्यावर येतात. म्हापण तें निवती बंदर या मार्गावर प्रवास करणारे सुमारे ६० ते ७० विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांनी मेढा ग्रामपंचायत मार्फत कुडाळ आगाराला निवेदन दिले आहे. तरी कणकवली विभाग नियंत्रक व कुडाळ आगारप्रमुखांनी लक्ष घालून कुडाळ-निवती बंदर ही शालेय बसफेरी तत्काळ सुरू करण्याची मागणी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांनी केली आहे.
--
पी.के. चौकेकर
जिल्हाध्यक्षपदी
मालवण ःबहुजन समाज पक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड. संदीप ताजने यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्गची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. बसपचे ज्येष्ठ कार्यकर्ते पी. के. चौकेकर यांची जिल्हाध्यक्षपदी, तर जिल्हा महासचिवपदी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, बौद्ध धम्माचे श्रामणेर प्रशिक्षण घेतलेले असे आनंद धामापूरकर यांची नियुक्ती करण्यात आली. बसपचे ज्येष्ठ कार्यकर्ते रवींद्र कसालकर व आनंद व सुधाकर माणगावकर यांची जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्षपदी बाळासाहेब खेमनगिरे, जिल्हा सचिव सुहास हिंदळेकर, तर कोषाध्यक्ष म्हणून नरेंद्र पेंडुरकर यांची नियुक्ती करण्यात आली. चौकेकर हे १९९३ पासून बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून फुले, शाहू आंबेडकर विचारधारा जिल्ह्यात पोहोचविण्यासाठी कार्यरत आहेत.
--
कापडोसवाडीत
गव्यांचा धुमाकूळ
कुडाळ ः दोन दिवसांपूर्वी आंदुर्ले-कापडोसवाडी येथील कोनकर यांच्या परसबागेत गवारेड्यांनी धुमाकूळ घातला. भाज्या फस्त केल्या, तर काही उत्पादनांची अक्षरश: नासधूस केली. शेत मांगराचेही दोन पत्रे फोडले. यात राजाराम रघुनाथ कोनकर यांचे जवळपास १ लाख रुपायांचे नुकसान झाले. आंदुर्ले गावातील कापडोस येथील ३० ते ४० गुंठे क्षेत्रात राजाराम कोनकर व त्यांच्या कुटुंबाने परसबाग तयार केली होती. तसेच भातशेतीही केली आहे. दोन दिवसांपूर्वी ही परसबाग व काही भातशेतीचे गवारेड्यांनी नुकसान केले. यात मुळा व लाल भाजी, अळी, तवसी, चिबूड, भेंडे, कणगी, हळद, मिरची आदींसह भातही फस्त केले. सात ते आठ गवारेड्यांचा हा कळप असून कोनकर यांचे उत्पादन गवारेड्यांनी पूर्णतः नासाडी केले.
---------------------
वेंगुर्लेतील रुपाली
पेडणेकर प्रथम
वेंगुर्ले ः उभादांडा सुखटणवाडी (ता.वेंगुर्ले) येथील रुपाली पेडणेकर हीने मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मॅकेनिकल इंजिनियरींग विषयात प्रथम क्रमांक मिळविला. रुपालीने फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी रत्नागिरी या महाविद्यालयात शिक्षण घेतले असून उभादांडा शाळा नं. २ येथे तिचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा येथे तिने एसएससीपर्यंतचे शिक्षण घेतले. तिने मॅकेनिकल इंजिनियरींग विषयात (सीजीपीओ ९.८७) प्रथम क्रमांक मिळविला.
----------------------
शिष्यवृत्ती परीक्षेत
ओटवणेचे दोघे
सावंतवाडी ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१ यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत ओटवणे येथील श्री रवळनाथ विद्यामंदिर या हायस्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी यश संपादन करून या योजनेची स्कॉलरशिप पटकाविली आहे. इयत्ता आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा १९ जूनला घेण्यात आली होती. ओटवणे हायस्कूलमधून श्रद्धा चिले (गवळीवाडी) आर्यन शृंगारे (गवळीवाडी) हे दोन्ही विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. हे दोन्ही विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ते या योजनेच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98300 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..