खेड-गुहागरमधून डॉ. विनय नातूंच्या उमेदवारीचे संकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-गुहागरमधून डॉ. विनय नातूंच्या उमेदवारीचे संकेत
खेड-गुहागरमधून डॉ. विनय नातूंच्या उमेदवारीचे संकेत

खेड-गुहागरमधून डॉ. विनय नातूंच्या उमेदवारीचे संकेत

sakal_logo
By

rat21p9.jpg
L51602
खेडः शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आमदार कदम यांनी खेड शहरातील भाजपच्या कार्यालयाला भेट दिली.
-rat21p10.jpg
51608
गणेशोत्सवादरम्यान गुहागरचे माजी आमदार डॉ. नातू यांनी रामदास कदम यांच्या जामगे निवासस्थानी भेट घेतली होती.
----------
गुहागरमधून डॉ. नातूंच्या उमेदवारीचे संकेत
शिंदे गट-भाजपची युती ; नेत्यांच्या गाठीभेटीने तयारी
खेड, ता. २१ः राज्यात भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाची समीकरणे जुळून आल्यानंतर कोकणातील राजकारणामध्ये भाजप व सेनेच्या शिंदेगटाचे ऋणानुबंध जुळू लागले आहेत. याचा प्रत्यय गेल्या दोन महिन्यांपासून येत असतानाच दापोली येथे झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या जाहीर सभेमध्ये माजी मंत्री रामदास कदम यांनी गुहागर विधानसभा मतदार संघातून भाजपचे डॉ. विनय नातू यांना निवडून आणण्याचा विडा उचलल्याचे जाहीर केल्याने या मतदार संघात आमदार जाधव यांच्याविरोधात डॉ. नातू असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
राज्यात सत्ताबदलाच्या हालचाली सुरू झाल्यानंतर त्याचा मोठा फटका कोकणलादेखील बसला. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सद्यःस्थितीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शिवसेनेच्या अनेक आमदारांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदेगट करून भाजपसोबत वेगळी चूल मांडली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असली तरी कोकणात भाजपची ताकद फारशी नाही. तरीदेखील गेल्या दहा वर्षांत भाजपाने कोकणात तळागाळात आपला कार्यकर्ता उभा करण्याच्या हेतूने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला यश येत आहे. दापोली येथे झालेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मेळाव्यात भाजपचे पदाधिकारी व्यासपीठावर दिसून आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यात सत्तांत्तर झाल्यानंतर शिवसेनेच्या शिंदेगटात सामिल झालेल्या आमदार योगेश कदम यांनी खेड शहरातील भाजपच्या कार्यालयाला भेट दिली, तर गणेशोत्सवादरम्यान माजी मंत्री रामदास कदम यांच्या जामगे येथील निवासस्थानी भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.
काही दिवसांपूर्वी महामार्गाच्या पाहणीप्रसंगी आलेल्या राज्याच्या सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्याप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे भरणेनाका येथे स्वागत केले. त्यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान ते सहभागी झाले होते. यापुढे कोकणात होणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची युती पाहायला मिळू शकते. दापोली येथील मेळाव्यात कदम यांनी यापुढे गुहागर विधानसभा मतदार संघातून डॉ. नातू यांना निवडून आणण्यासाठी विडा उचलला असून यापुढे दापोलीसह कोकणातील अन्य ठिकाणी भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाची युती ही आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे यापूर्वीच्या अडीच वर्षांत आघाडीतील (शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस) यांच्यात असलेले कुरघोडीचे राजकारण बाजूला ठेवत त्यांना एकत्र येऊन लढावे लागणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98303 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..