ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बिबट्या नॉट रिचेबल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बिबट्या नॉट रिचेबल
ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बिबट्या नॉट रिचेबल

ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बिबट्या नॉट रिचेबल

sakal_logo
By

ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये
बिबट्या नॉट रिचेबल
दाभोळः साखळोली येथे वनविभागाकडून लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बिबट्याच दिसून येत नाही. महिन्याभरापूर्वी साखळोली येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांवर बिबट्याने हल्ला केला होता. त्या आधीदेखील बिबट्याने हल्ले केले होते. त्यामुळे दापोली वनविभागाकडून येथे तीन ते चार ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत; मात्र यातील एकाही कॅमेरात अद्याप बिबट्याच दिसून आलेला नसल्याचे वन विभागाकडून समोर आले. तसेच स्थानिकांनाही अद्याप बिबट्याचे दर्शन दिलेले नाही. त्यामुळे हा बिबट्या दुसरीकडे कुठेतरी स्थलांतरित झालेला असावा, असे स्थानिकांमधून बोलले जात आहे.
----------
केळशी-रत्नागिरी बस
रद्द केल्याने संताप
दाभोळ ः दापोली तालुक्यातील केळशी येथून सकाळी पावणे सात वाजता सुटणारी केळशी-दापोली-रत्नागिरी ही बससेवा अचानकपणे रत्नागिरी आगाराने खंडित केल्याने केळशी परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत असून याबाबत त्वरित लक्ष न दिल्यास प्रवासवर्ग आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. केळशी हे दापोली तालुक्याचे शेवटचे टोक असून या परिसरातील प्रवाशांना वैद्यकीय सेवा, प्रशासकीय कामे यांच्यासाठी रत्नागिरी येथे वारंवार जावे लागते. आंजर्ले-आडे खाडी पूल सुरू होण्यापूर्वी मंडणगड आगाराची केळशी-मंडणगड-रत्नागिरी अशी बससेवा उपलब्ध होती; मात्र खाडीपूल सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा वाचणारा वेळ व पैसा लक्षात घेऊन आंजर्ले-रत्नागिरी अशी सुरू असणारी बससेवा केळशीपर्यंत विस्तारित करण्यात आली तसेच ही सेवा रत्नागिरी आगाराने आपल्याकडे वर्ग करून घेतली. सायंकाळी साडे तीन वाजता रत्नागिरी येथून सुटणाऱ्या या बसमुळे दापोली, हर्णै, पाजपंढरी, आंजर्ले, केळशी येथील प्रवाशांची सोय होत. काही दिवसांपासून अचानकपणे रत्नागिरी आगाराच्या चालक वाहकांनी ही बस दापोलीपर्यंतच नेण्यास सुरवात केली. त्यामुळे केळशी परिसरातील प्रवाशांचे हाल होण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, याबाबत आडे ग्रामस्थांनी ही बससेवा केळशीत नेण्यास अडचण असल्यास चालक वाहकांची राहण्याची सोय आडे येथे करण्यात येईल, असे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98307 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..