वागदेतील महामार्गबाधितांना मिळाली नुकसानभरपाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वागदेतील महामार्गबाधितांना मिळाली नुकसानभरपाई
वागदेतील महामार्गबाधितांना मिळाली नुकसानभरपाई

वागदेतील महामार्गबाधितांना मिळाली नुकसानभरपाई

sakal_logo
By

51664
वागदे : येथील महामार्ग बाधितांना मोबदला मिळाल्‍याने रखडलेल्‍या मार्गिकेची आता दुरुस्ती होणार आहे.

वागदेतील महामार्गबाधितांना मिळाली नुकसानभरपाई

सर्वपक्षीय आंदोलनाचे फलित; सातत्‍याने अपघात होत असल्‍याने वेधले होते लक्ष

कणकवली, ता. २१ : वागदे येथील महामार्ग बाधितांच्या खात्‍यावर अखेर जमिनीचा मोबदला जमा झाला आहे. याबद्दल जमीन मालकांनी प्रांताधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच मोबदला जमा झाल्‍यानंतर येथील रखडलेल्‍या मार्गिकेच्या दुरुस्तीचाही मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील गोपुरी आश्रम ते गडनदी पूल या दरम्‍यानच्या पाचशे मीटर लांबीच्या मार्गिकेचे काम जमीन मालकांना मोबदला न मिळाल्‍याने गेले तीन वर्षे रखडले होते. त्‍यामुळे या टप्प्यात एकाच मार्गिकेवरून वाहनांची ये-जा होत होती. मात्र, याबाबतची माहिती वाहन चालकांना होत नसल्‍याने सातत्‍याने अपघात होत होते. गेल्‍या तीन वर्षांत या ठिकाणी चौघांचा बळी गेला होता. तर २६ ऑगस्ट २०२२ रोजी जीप आणि कंटेनर यांच्यातील अपघातात जीप चालक जागीच ठार झाला होता.
या अपघातानंतर सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि स्थानिकांनी एकत्र येऊन आंदोलन छेडले आणि तीन तास महामार्ग रोखून धरला होता. यावेळी महामार्ग अधिकाऱ्यांशी झालेल्‍या चर्चेनंतर प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी संबंधित जमीन मालकांना वीस दिवसांत जमिनीचा मोबदला देण्याची ग्‍वाही दिली होती. त्‍यानंतर येथील दुसरी मार्गिका तात्‍पुरत्या स्वरूपात खुली करण्यात आली होती.
---
मार्गिकेचे काम जाणार पूर्णत्‍वास
दरम्‍यान, काल (ता. २०) येथील जमीन मालकांच्या खात्‍यामध्ये भूसंपादन रक्‍कम जमा झाली. याबाबतची माहिती जमीन मालकांनी प्रांताधिकाऱ्यांना दिली आणि आभारही मानले. दरम्‍यान, गोपुरी आश्रम ते गडनदी पूल या दरम्‍यानच्या मार्गिकेचा काही भाग डांबरीकरण होणे शिल्‍लक होते. आता मोबदला रक्‍कम मिळाल्‍याने येथील मार्गिकेचे काम पूर्णत्‍वास जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98317 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..