पुण्यातील राष्ट्रीय कार्यशाळेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची टीम रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील राष्ट्रीय कार्यशाळेसाठी
सिंधुदुर्ग जिल्ह्याची टीम रवाना
पुण्यातील राष्ट्रीय कार्यशाळेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची टीम रवाना

पुण्यातील राष्ट्रीय कार्यशाळेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची टीम रवाना

sakal_logo
By

पुण्यातील कार्यशाळेसाठी
जिल्ह्याची टीम रवाना
सिंधुदुर्गनगरी, ता. २१ ः ‘स्वच्छ हरित ग्राम’ व ‘जल समृद्धी गाव’, या शाश्वत विकासाध्येयावर आधारित राष्ट्रीय कार्यशाळा २२ व २३ ला पुणे येथे केंद्र व राज्याच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यशाळेला जिल्हा परिषद अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी, सरपंचांचा समावेश असलेली २० जणांची टीम आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पुणे येथे रवाना झाली.
पुणे येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यमंदिर, चिंचवड येथे २२ व २३ ला आयोजित केलेल्या शाश्वत विकासाध्येयावर आधारित राष्ट्रीय कार्यशाळेसाठी जिल्हा परिषदेचे ५ अधिकारी, ५ ग्रामसेवक व विस्तार अधिकारी आणि १० सरपंच आज रवाना झाले. या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. पुणे येथील या कार्यशाळेत जिल्हा परिषद ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कार्यशाळेला केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्री, केंद्र व राज्याचे सचिव आदी प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेत स्वच्छ व हरित ग्राम, जल समृध्द गाव या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्ह्यातून यासाठी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, मालवण गटविकास अधिकारी अप्पासाहेब गुजर, ग्रामपंचायत विभाग विस्तार अधिकारी महादेव शिंगाडे यांच्यासह कुडाळ व कणकवलीचे ग्रामविस्तार अधिकारी, बापर्डे, वानिवडे, बुधवळे-कुडोपीचे ग्रामसेवक तसेच बिळवस, भोगवे, पावशी, कुंदे, पिकुळे, साकेडी, कोळोशी, उंबर्डे, हडपीड, बापर्डे ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा समावेश आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98324 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..