सरकारमुळे लाखो तरुण बेरोजगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरकारमुळे लाखो तरुण बेरोजगार
सरकारमुळे लाखो तरुण बेरोजगार

सरकारमुळे लाखो तरुण बेरोजगार

sakal_logo
By

51635
सावंतवाडी ः नायब तहसीलदार लता वाडकर यांच्याकडे निवेदनन देताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)

सरकारमुळे लाखो तरुण बेरोजगार

राष्ट्रवादीची टीका; मुख्य-उपमुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये नेऊन महाराष्ट्रातील लाखो तरुणांना बेरोजगारीच्या गर्तेत लोटण्याचे काम नव्या सरकारने केले, असा आरोप राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केला आहे. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे झालेल्या नुकसानीची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत आज जिल्हा राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाच्यावतीने निषेध करून नायब तहसीलदार लता वाडकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, तालुका उपाध्यक्ष बाबतीस फर्नांडिस, संतोष जोईल, काशिनाथ दुभाषी, युवक तालुकाध्यक्ष अर्षद बेग, राकेश नेवगी, चेतन बामणे, उद्योग व्यापार महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर-देसाई, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, सावंतवाडी युवती तालुकाध्यक्ष प्रियांका कांबळे आदी उपस्थित होते.
निवेदनात नमूद केले आहे की, देशाच्या अर्थकारणात सर्वाधिक हातभार लावणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद आहे; परंतु राज्यात येणारे उद्योग, व्यावसाय सातत्याने इतर राज्यात नेले जात आहेत. त्यात केंद्राच्या हस्तक्षेपामुळे गुजरातला झुकते माप दिले जात आहे. महाराष्ट्रत येणारा वेदांता-फॉक्सकॉन हा रोजगार देणारा मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी तातडीने पावले उचलावीत. ''महाविकास''चे सरकार सत्तेत असताना खनिकर्म क्षेत्रातील वेदांता व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती करणारी तैवानची फॉक्सकॉन या कंपन्यांचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार, हे निश्चित झाले होते. प्रकल्पासाठी पुणे-तळेगाव येथे जागाही ठरली होती; परंतु हा प्रकल्प थेट गुजरातला का गेला? असा प्रश्न राज्यातील बेरोजगार युवक व जनता विचारत आहे. तब्बल २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा आणि लाखोंच्या जवळपास बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारा हा देशातील पहिला सेमी कन्डक्टर निर्मितीचा हा प्रकल्प होता. यामुळे राज्य पुन्हा एकदा औद्योगिक क्षेत्रात मागे पडले आहे. राज्यावर वेळोवेळी अन्याय होत असून त्यामुळे बेराजगारी निर्माण होऊन महाराष्ट्र ही बेरोजगारांची भूमी म्हणून ओळखली जाईल. राज्यातील लाखो तरुणांना बेरोजगारीच्या गर्तेत या सरकारने लोटले आहे. त्यामुळे राज्यातील तरुणाईला रोजगार मिळवून देण्याबाबतसिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्योग व व्यापार विभागाच्यावतीने निवेदन दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98361 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..