श्रावणधारा सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रावणधारा सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन
श्रावणधारा सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन

श्रावणधारा सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन

sakal_logo
By

श्रावणधारा सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन
कणकवली, ता. २१ः आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे आणि डॉ. राजअहमद हुसेनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुळ बुद्रुक यांच्यावतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यात कलात्मक विकास व्हावा या उद्देशाने व दर्जेदार व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने शालेय विद्यार्थ्यांसाठी व खुल्या गटासाठी जिल्हास्तरीय श्रावणधारा सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा पाचवी ते आठवी, नववी ते बारावी आणि खुला अशा तीन गटात होणार आहे. तिन्ही गटांना भावगीत ,भक्तीगीत,नाट्यगीत, गजल यापैकी एका विषयावर पाच मिनिटे गाणे सादर करायचे आहे. यासाठी विजेत्यांना पारितोषिक देवून गौरविण्यात येणार आहे. पहील्या गटात अनुक्रमे पंधराशे, एक हजार आणि आठशे रूपये तसेच सर्वाना चषक, तर दुसऱ्या गटात अनुक्रमे दोन, दीड आणि एक हजार, खुला गटात अडीच, दोन आणि एक हजार, तसचे तिन्ही गटातील उत्तेजनार्थासाठी प्रमाणपत्र दिले जाईल. स्पर्धा ही एकल गायन स्पर्धा आहे. स्पर्धकांनी नावे २८ सप्टेंबरपर्यत नोंदवावीत. प्रथम फेरी एक ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी एक आणि प्रथम फेरीमध्ये पसंतीच्या एका गाण्याचा एक अंतरा सादर करावा. अंतिम फेरी सात ऑक्टोंबरला आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे येथे होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98364 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..