रत्नागिरी तालुका काँग्रेसची 24 ला महत्वाची बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी तालुका काँग्रेसची 24 ला महत्वाची बैठक
रत्नागिरी तालुका काँग्रेसची 24 ला महत्वाची बैठक

रत्नागिरी तालुका काँग्रेसची 24 ला महत्वाची बैठक

sakal_logo
By

रत्नागिरी तालुका काँग्रेसची
२४ ला महत्वाची बैठक
रत्नागिरी ः रत्नागिरी तालुक्यातील होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणनीती ठरवण्यासाठी शनिवारी (ता. २४) काँग्रेसची महत्त्वाची बैठक सकाळी साडेअकरा वाजता आयोजित केली आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी आहे; मात्र काही दिवसांपासून काँग्रेस आघाडीवर नाराज आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुकीत स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने रत्नागिरी तालुका काँग्रेसची बैठक लावण्यात आली आहे. काँग्रेस भवन कार्यालयात या बैठकीचे आयोजित करण्यात आले आहे. बैठकीस रत्नागिरी तालुक्यातील प्रदेश प्रतिनिधी, जिल्हा काँग्रेस कमिटी पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय, सेवादल, सोशल मीडिया विभाग, अनुसूचित जाती जमाती विभाग, अल्पसंख्यांक विभाग, सामाजिक न्याय विभाग, ग्राहक संरक्षण विभाग आदी विभागाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते व काँग्रेसप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी तालुकाध्यक्ष विकास पाटील यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98390 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..