दाभोळ-स्थानिक आदिवासी उमेदवारांना प्राधान्य द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-स्थानिक आदिवासी उमेदवारांना प्राधान्य द्या
दाभोळ-स्थानिक आदिवासी उमेदवारांना प्राधान्य द्या

दाभोळ-स्थानिक आदिवासी उमेदवारांना प्राधान्य द्या

sakal_logo
By

स्थानिक आदिवासी उमेदवारांना प्राधान्य द्या

कोकण कृषी विद्यापीठ भरती ; बिरसा फायटर्सचे निवेदन

दाभोळ, ता. २२ ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीअंतर्गत पदभरतीत रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक आदिवासी उमेदवारांना प्राधान्य द्या, अशी मागणी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी कृषी विद्यापिठाचे कुलगुरू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
कोकण कृषी विद्यापिठात स्थानिक आदिवासी उमेदवारांचे नोकरीचे प्रमाण वर्षानुवर्ष शून्य टक्के आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे हे कृषी विद्यापीठ असून विद्यापिठाच्या अंतर्गत एकही स्थानिक आदिवासी उमेदवार कुठल्याही पदावर नोकरीला नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. भारतीय संविधानानुसार अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील उमेदवारांना पदभरतीत ७.५० टक्के आरक्षण आहे; परंतु त्यानुसार आपल्या विद्यापिठात पदभरती होताना दिसत नाही. उमेदवार उपलब्ध नाही, अशी खोटी माहिती दाखवून राखीव अनुसूचित जमातीच्या जागांवर अन्य उमेदवारांना नोकरी दिली जाते. ज्यांच्याकडे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अद्यापही नाही व ज्यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने व उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरेलच आहेत, असे अनेक उमेदवार विद्यापिठात नोकरी करताना दिसतात. अशा काही उमेदवारांना अधिसंख्य करण्यात आले आहे. अनेक उमेदवार जात प्रमाणपत्र सादर न करता सेवानिवृत्त झाले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात बहुसंख्य आदिवासी उमेदवार पदवीधर व उच्चशिक्षित आहेत. चुकीच्या भरती प्रक्रियेमुळे हे उमेदवार बेरोजगार आहेत. राज्यात विविध विभागात आदिवासी समाजाच्या एकूण ११ हजार ५०० जागा रिक्त करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागामध्ये आदिवासींच्या एकूण ५५ हजार ३१९ जागा आहेत. आदिवासी समाजाचे अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. कोकण कृषी विद्यापीठअंतर्गत होणार्‍या पदभरतीत रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक आदिवासी उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेतर्फे विद्यापीठ प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनाला देण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98397 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..