रत्नागिरी- सुहास पटवर्धन यांना राज्यस्तरीय पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- सुहास पटवर्धन यांना राज्यस्तरीय पुरस्कार
रत्नागिरी- सुहास पटवर्धन यांना राज्यस्तरीय पुरस्कार

रत्नागिरी- सुहास पटवर्धन यांना राज्यस्तरीय पुरस्कार

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२१p१३.jpg- KOP२२L५१६४३ सुहास पटवर्धन
------------
सुहास पटवर्धनांना राज्यस्तरीय
आदर्श व्यापारी पुरस्कार
--
दी पूना मर्चंट्स चेंबर ; रविवारी पुण्यात वितरण
रत्नागिरी, ता. २१ ः दी पूना मर्चंट्स चेंबरचा राज्यस्तरीय आदर्श व्यापारी पुरस्कार रत्नागिरीतील समर्थ भांडारचे सुहास पटवर्धन यांना जाहीर झाला आहे. मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी या संबंधी माहिती दिली.
रविवारी (ता. २५) सायंकाळी ५ वा. वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. व्यापारमहर्षी उत्तमचंद उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षी हा कार्यक्रम होतो. या प्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार माधुरी मिसाळ, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, उद्योजक प्रकाश धारिवाल उपस्थित राहणार आहेत.
(कै.) पर्शराम गोविंद तथा बापूराव पटवर्धन यांनी १९४८ मध्ये लक्ष्मीचौक येथे समर्थभांडार या नावाने किराणा व्यापार व्यवसायाची स्थापना केली. त्यांच्यासोबत त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र (कै.) जयंतराव आणि सुहास पटवर्धन यांनी हा व्यवसाय वाढवला. वडील व भावाच्या पश्चात या उद्योग समुहाची धुरा सुहासराव समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्याबरोबर गेली २५ वर्षे त्यांचे सुपुत्र रोहित व रणजीत तसेच पुतण्या हृषिकेश जयंत पटवर्धन हेही समर्थपणे व्यवसायाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी किराणा मालासोबत ७० वर्ष हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीची एजन्सी, १९६७ पासून हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीची गॅस एजन्सी सुरू केली. १९८८ ला रत्नागिरी शहरात दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र सुरू झाले तेव्हा त्यांनी समर्थ एंटरप्रायजेस या नावाने टीव्ही, रेफ्रिजरेटर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या विक्री व्यवसायासाठी नव्या दालनाचा आरंभ केला. त्यानंतर अनेक कंपन्यांची जिल्हा वितरणाची जबाबदारी सांभाळली. १९९० नंतर संगणकाचा सुयोग्य वापर आणि गेल्या काही वर्षांत ऑनलाइन पद्धतीने व्यवहारासाठी सुहासभाऊंनी विशेष लक्ष दिले.
सुहास पटवर्धन यांनी एमआयडीसीमध्ये तीनमजली फर्निचर मॉल सुरू केला. गेल्या पन्नासहून अधिक वर्षांची त्यांची व्यावसायिक कारकीर्द आहे. त्यांचा कामाचा उत्साह पाहण्यासारखा आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य म्हणून गेली दहा वर्षे कार्यरत आहेत. तसेच त्यांनी गो आधारित शेती व्यवसायाचा अवलंब केला आहे. आता इस्त्राइल पद्धतीची घन आंबा लागवड विकसित करून सम आंबा उत्पादन घेण्याचा त्यांचा मानस आहे. या सर्व व्यावसायिक वाटचालीत त्यांना त्यांच्या पत्नी मीना, मुले, सुना, नातवंडे, पुतण्या यांची भरभरून साथ आहे. सुहास पटवर्धन यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98414 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..