पिंगुळीत शनिवारपासून विविध स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंगुळीत शनिवारपासून विविध स्पर्धा
पिंगुळीत शनिवारपासून विविध स्पर्धा

पिंगुळीत शनिवारपासून विविध स्पर्धा

sakal_logo
By

सडवेलकर मित्रमंडळातर्फे
पिंगुळीमध्ये विविध स्पर्धा
कुडाळ,ता.२१ ः श्री गंगाराम गणेश सडवेलकर मित्रमंडळाच्यावतीने पिंगुळी केंद्रात २४ सप्टेंबरपासून विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या श्री गंगाराम गणेश सडवेलकर मित्रमंडळ आयोजित केंद्र पिंगुळी व पिंगुळी गावातील शाळांमध्ये २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. याचा पहिला टप्पा २४ पासून सुरू होत आहे.
स्पर्धा अशा ः गट - १ - पहिली व दुसरी स्पर्धा - १) रंग भरण २) बडबड गीत (वेळ ३ मिनिटे). गट - २ - तिसरी व चौथी स्पर्धा - १) मराठी हस्ताक्षर दुरेघी ओळीत.(मराठी प्रतिज्ञा) २) कथाकथन ( वेळ ५ मिनिटे ). गट - ३ - पाचवी ते सातवी स्पर्धा - १) चित्रकला २) वेशभूषा (वेळ २ मिनिटे), ३) प्रश्नमंजुषा ४) इंग्रजी हस्ताक्षर चौरेघी ओळीत. (इंग्रजी प्रतिज्ञा) वरील प्रश्न मंजुषा वगळता सर्व स्पर्धांसाठी शाळेतून दोन स्पर्धक असतील. प्रश्न मंजुषेसाठी दोन विद्यार्थ्यांचा एकच गट पाठवावा. हस्ताक्षर स्पर्धा (मराठी व इंग्रजी केंद्रस्तरासाठी), रंगभरण स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा (शाळास्तर) साठी मुलांना कागद पुरविले जातील. स्पर्धा यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख धोंडू रेडकर व उत्तम हरमलकरयांचे विशेष सहकार्य लाभत आहे. या स्पर्धात नेरूर गोवेरी, गोवेरी भगतवाडी, पिंगुळी गोंधयाळे उर्दू वाडीवरावडे, पिंगुळी आसनाचे पाणी, पिंगुळी गोंधयाळे मराठी, पिंगुळी सराफदार वाडी शाळा, पिंगुळी केंद्रशाळा क्रमांक १, पिंगुळी-धुरीटेंबनगर व हरिजनवाडा या शाळांतील स्पर्धक सहभागी होणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98424 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..