लांजा कुणबी पतसंस्थेचा दीपस्तंभ पुरस्काराने गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा कुणबी पतसंस्थेचा दीपस्तंभ पुरस्काराने गौरव
लांजा कुणबी पतसंस्थेचा दीपस्तंभ पुरस्काराने गौरव

लांजा कुणबी पतसंस्थेचा दीपस्तंभ पुरस्काराने गौरव

sakal_logo
By

rat२१p७.jpg
५१६००
लांजाः दीपस्तंभ पुरस्कार स्वीकारताना कुणबी पतपेढीचे संचालक.
----------
लांजा कुणबी पतसंस्थेचा
दीपस्तंभ पुरस्काराने गौरव
लांजा, ता. २१ः जिल्हा कार्यक्षेत्र असलेली लांजा तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या कुणबी विकास सहकारी पतसंस्था लांजाला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अत्यंत मानाच्या अशा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्काराने गौरवण्यात आले. महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संस्थेच्या या एकूणच कामगिरीची दाखल घेत महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनने केलेल्या चार गटांपैकी १० ते ५० कोटी ठेवींच्या गटातून कुणबी पतसंस्थेची राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कारासाठी निवड केली होती. पतसंस्थेचे उपाध्यक्ष विलास दरडे, संचालक शांताराम गाडे, नंदकुमार आंबेकर, गणेश जोशी, वसंत बंडबे व मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप डाफळे यांनी महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष कोयटे यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, रत्नागिरी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, सहकारी संस्था रत्नागिरीचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98427 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..