शृंगारतळीत शिवसैनिकांकडून रामदास कदम यांचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शृंगारतळीत शिवसैनिकांकडून रामदास कदम यांचा निषेध
शृंगारतळीत शिवसैनिकांकडून रामदास कदम यांचा निषेध

शृंगारतळीत शिवसैनिकांकडून रामदास कदम यांचा निषेध

sakal_logo
By

rat21p33.jpg
51713
गुहागरः श्रृंगारतळी येथे रामदास कदम यांचा निषेध करताना शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक.
----------
शृंगारतळीत शिवसैनिकांकडून
रामदास कदम यांचा निषेध
गुहागर, ता. २१ ः दापोलीत शिंदे गटाच्या मेळाव्यात रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबीयांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी आज गुहागरमधील शिवसैनिकांनी शृंगारतळी येथे गुहागर-विजापूर महामार्गावर आंदोलन केले. या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम उपस्थित होते.
शिवसैनिकांनी रामदास कदम यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर तालुकाप्रमुख सचिन बाईत म्हणाले, सध्या राजकारणामध्ये ज्या अनिष्ट प्रथा सुरू झाल्या आहेत त्या महाराष्ट्रासाठी घातक आहेत. आमच्या नेत्यांवर कोणी नैतिकता सोडून वैयक्तिक टीका केली तर ती खपवून घेतली जाणार नाही. जिल्हाप्रमुख सचिन कदम म्हणाले, रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. यापूर्वी शिवसेनेने ज्यांना मोठे केले तेच आता खाल्लेल्या ताटात घाण करत आहेत. शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक हा अपमान कधीच सहन करणार नाहीत. या आंदोलनामध्ये गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत, उपतालुकाप्रमुख जयदेव मोरे, महिलाप्रमुख नेत्रा ठाकूर, पाटपन्हाळेचे सरपंच संजय पवार, वेळणेश्वरचे सरपंच चैतन्य धोपावकर, पिंपरच्या सरपंच उर्वी मोरे, वेळणेश्वर गटाचे विभागप्रमुख विलास वाघे, उपविभागप्रमुख समीर डिंगणकर, प्रथमेश निमुणकर, विलास गुरव, बाबा देवळेकर, नारायण गुरव, प्रमोद शिर्के, सिद्धिविनायक जाधव, पिंट्या संसारे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98428 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..