विदुषी डॉ. अलका देव-मारुलकरांची रत्नागिरीत शास्त्रीय संगीत कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विदुषी डॉ. अलका देव-मारुलकरांची रत्नागिरीत शास्त्रीय संगीत कार्यशाळा
विदुषी डॉ. अलका देव-मारुलकरांची रत्नागिरीत शास्त्रीय संगीत कार्यशाळा

विदुषी डॉ. अलका देव-मारुलकरांची रत्नागिरीत शास्त्रीय संगीत कार्यशाळा

sakal_logo
By

rat21p34.jpg
51717
डॉ. अलका देव-मारुलकर
----------
विदुषी डॉ. अलका देव-मारुलकरांची
रत्नागिरीत शास्त्रीय संगीत कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ः ज्येष्ठ शास्त्रीय गायिका विदुषी डॉ. अलका देव-मारुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपांत्य आणि विशारद अभ्यासक्रमातील काही रागांच्या बंदिशी व वेगवेगळ्या तालानुसार त्यांची मांडणी या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले आहे. येथील ‘स्वराभिषेक-रत्नागिरी’ संगीतवर्गातर्फे येत्या २ ऑक्टोबरला शास्त्रीय संगीतातील उपांत्य विशारद व त्यापुढील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच संगीत शिक्षकांसाठी ही कार्यशाळा घेण्यात येत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर आणि रायगड आदी ठिकाणचे विद्यार्थी, शिक्षक यामध्ये सहभाग घेऊ शकतात.
विदुषी डॉ. मारुलकर यांना संगीत शिरोमणी, डॉ. प्रभा अत्रे पुरस्कार, संगीत कौमुदी आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. त्यांनी जयपूर, ग्वाल्हेर आणि किराणा घराण्याच्या मिलाफातून समग्र गायकी प्रस्थापित केली आहे. शास्त्रीय गायनाबरोबरच उपशास्त्रीय गायनातही त्यांचा हातखंडा आहे. रत्नागिरी येथील थिबा पॅलेसजवळील श्री गगनगिरी महाराज आश्रमाच्या सभागृहात सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत कार्यशाळा होईल. सहभागी विद्यार्थ्यांना चहा-नाश्ता, दुपारचे जेवण याची व्यवस्था करण्यात येणार आहे. इच्छुकांनी नावनोंदणीसाठी ''स्वराभिषेक-रत्नागिरी'' संस्थेशी संपर्क साधावा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98434 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..