मालवणात २६ पासून भजन महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात २६ पासून भजन महोत्सव
मालवणात २६ पासून भजन महोत्सव

मालवणात २६ पासून भजन महोत्सव

sakal_logo
By

51740
श्री देवी भैरवी

मालवणात २६ पासून भजन महोत्सव

नवरात्रोत्सवाचे निमित्त; भैरवी मंदिरात आयोजन

मालवण, ता. २१ : शहरातील बाजारपेठेतील श्री देवी भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भजन महोत्सव २०२२ चे आयोजन केले आहे. या महोत्सवात २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत श्री देवी भैरवी मंदिर, संतसेना मार्ग सोमवार पेठ येथे दररोज रात्री आठला भजन सेवा सादर करण्यात येणार आहे.
भजन महोत्सवासाठी जिल्ह्यातील नामवंत बुवांना निमंत्रित करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन डबलबारी भजनाचे प्रसिद्ध बुवा गुंडू सावंत (वर्दे, ता. कुडाळ) यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सवाचे दहावे वर्ष आहे. यावेळी नाभिक समाजाचे नेते विजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, दीपक पाटकर, उद्योजक अनिल मालवणकर, शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर, नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सावंत बुवांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. २६ ला श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ (बुवा गुंडू सावंत, पखवाज-विराज बावकर), श्री गोपाळकृष्ण प्रासादिक भजन मंडळ श्रावण-गवळीवाडी (बुवा- संजय चव्हाण, पखवाज - संकल्प चव्हाण), २७ ला श्री देवी भवानी प्रासादिक भजन मंडळ, भोगवे (बुवा-मदन करलकर), २८ ला अष्टपैलू कलानिकेतन मालवण (बुवा-सुनील परुळेकर), २९ ला ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ, आनंदव्हाळ (बुवा-पप्पू सामंत), ३० ला श्री रेकोबा प्रासादिक भजन मंडळ, सुतारवाडी-वायरी (बुवा-अक्षय परुळेकर), १ ला श्री ब्राह्मणदेव प्रासादिक मंडळ कातवड-मालवण (बुवा-मंगेश नलावडे), २ ला ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ न्हिवे-कोळंब मालवण (बुवा-राजन दळवी, सिद्धेश पाताडे), ३ ला आकारी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ, कांदळगाव-कातवड (बुवा-चेतन धुरी), ४ ला सातेरी प्रासादिक भजन मंडळ कांदळगाव-देऊळवाडी (बुवा-राजेंद्र कोदे, पखवाज-बंटी कांदळगावकर, दत्ताराम डिकवलकर), ५ ला अष्टविनायक प्रासादिक महिला भजन मंडळ, साळेल (बुवा-अंकिता गावडे). या महोत्सवाचा भजन रसिकांनी सहभागी लाभ घ्यावा, असे आवाहन भैरवी मंदिर बाळगोपाळ मित्रमंडळाचे अध्यक्ष अंकुश चव्हाण, विजय चव्हाण, ललित चव्हाण, जगदीश वालावलकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98443 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..