आंबडस चिरणी लोटे मार्गाला जिल्हा मार्गाचा दर्जा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबडस चिरणी लोटे मार्गाला जिल्हा मार्गाचा दर्जा
आंबडस चिरणी लोटे मार्गाला जिल्हा मार्गाचा दर्जा

आंबडस चिरणी लोटे मार्गाला जिल्हा मार्गाचा दर्जा

sakal_logo
By

आंबडस-चिरणी लोटे मार्गाला
जिल्हामार्गाचा दर्जाः चव्हाण
परशुराम घाटाला सक्षम पर्यायासाठी
चिपळूण, ता. २१ः परशुरामघाटाला पर्याय ठरलेल्या आंबडस-चिरणी-लोटे या मार्गाला आता प्रमुख मार्गाचा दर्जा दिला आहे. सार्वजनिक बांधकामंत्री रवींद्र चव्हाण यांनी याबाबतची घोषणा केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने परशुराम घाटाकरिता आंबडस-चिरणी-लोटे मार्ग पर्यायी म्हणून उपयोगात आणला आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेला हा मार्ग आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या मार्गाला प्रमुख जिल्हामार्गाची दर्जोन्नती दिली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटरस्त्याचे आणि दुरुस्तीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होतात आणि वाहतुकीचा खोळंबा होतो. पावसाळ्यापूर्वी परशुराम घाटातील धोकादायक डोंगरकटाई करण्यात आली. म्हणून परशुराम घाट बंद करण्यात आला होता. त्या वेळी आंबडस-चिरणी-लोटे या पर्यायी मार्गांचा वापर करण्यात आला होता. अवजडसह चारचाकी वाहने या मार्गावरून जात होती. खेड तालुक्यात या मार्गाचा पर्याय सार्वजनिक बांधकाम विभागाने खुला केला आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या आंबडस-चिरणी-लोटे या इतर जिल्हामार्ग ४२ या रस्त्याची एकूण लांबी ७.२५० किमीची आहे. या रस्त्यावर आंबडस, चिरणी व लोटे अशी गावे येतात. हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत हस्तांतरित होणार असल्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण व दुरुस्ती लवकरच हाती घेणे शक्य होणार आहे. विशेष बाब म्हणून प्रमुख हा जिल्हामार्ग १०२ असा दर्जोन्नत करण्यात येत असल्याचेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.
-------------
कोट
सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी आंबडस-चिरणी-लोटे मार्गाला जिल्हामार्गाचा दर्जा दिला त्याबद्दल मंत्र्यांचे अभिनंदन; मात्र या मार्गाची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. हा एकेरी मार्ग आहे. त्याला दुहेरी करून रस्त्याचे रूंदीकरण करणे गरजेचे आहे. सार्वजनिक विभागाने ते करणे गरजेचे आहे.
- रवींद्र कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते, कळंबस्ते

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98459 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..