तळसरचा बेपत्ता तरुण निघाला चोरटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळसरचा बेपत्ता तरुण निघाला चोरटा
तळसरचा बेपत्ता तरुण निघाला चोरटा

तळसरचा बेपत्ता तरुण निघाला चोरटा

sakal_logo
By

ratchl२१५.jpg
५१७५३
चिपळूणः पोलिसांनी जप्त केलेले विद्युतपंप.
-------
तळसरचा बेपत्ता तरुण निघाला चोरटा
वाशिष्ठी दूध प्रकल्पात चोरी ; तिघांना अटक, मुद्देमाल जप्त
चिपळूण, ता. २१ः पिंपळी खुर्द येथील वाशिष्ठी मिल्क प्रोडक्ट येथे झालेल्या पाण्याच्या आठ पंपाच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी तत्काळ छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपीकडून १ लाख ४४ हजाराचे आठ पंप व गुन्ह्यात वापरलेली ८५ हजाराची रिक्षा असा एकूण २ लाख २९ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याच आरोपींकडून भंगार चोरीप्रकरणी आणखी १० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तळसर येथून बेपत्ता असलेल्या तरुणाचाही या चोरीत सहभाग असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
काही दिवसांपूर्वी गुहागर मार्गावरील मिरजोळी साखरवाडी येथे एका भंगाराच्या गोडावूनमधून चोरट्यांनी एक लाख २८ हजार २५० रुपये किंमतीचा माल चोरून नेला होता. याबाबतची फिर्याद संदेश बंसत भोबेकर (वय ४५, रा. मुरादपूर ता. चिपळूण) यांनी दिली होती. ही घटना ११ सप्टेंबरला घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी १३ सप्टेंबरला आरोपी शिवशंकर कैलास विश्वकर्मा (२०, रा. खेर्डी, भुरणवाडी), अक्षय उर्फ मिहीर अशोक गायकवाड (२२, रा. तळसर मुंडे, गायकवाडवाडी) यांना अटक केली होती. त्यांच्याकडून ८८ हजार रुपयांचे तांबे जप्त केले. या प्रकरणी अधिक चौकशी करताना पिंपळी खुर्द येथील वाशिष्ठी मिल्क प्रोडक्ट येथे झालेल्या चोरीचा उलगडा झाला. ३१ ऑगस्टला सायंकाळी ७ ते १ सप्टेंबर या वेळेत ही चोरी घडली होती. यामध्ये १ लाख ४४ हजार रुपये किंमतीचे आठ पाण्याचे पंप चोरीस गेले होते. या प्रकरणी संजय बाबू पवार (५५, रा. खेर्डी, विकासवाडी) यांनी तक्रार दिली होती. या चोरीची शिवशंकर विश्वकर्मा व अक्षय उर्फ मिहीर गायकवाड यांनी कबुली देताच त्यांना अटक करण्यात आली. चोरलेले पंप त्यांनी मलकापूर (ता. कराड) येथे विकल्याचे सांगितले. त्यानुसार धर्मराज रामजियावन सहानी (३२, रा. खैरात, देबारिया, उत्तरप्रदेश सध्या रा. बागबान ट्रान्सपोर्ट, शास्त्रीनगर, मलकापूर, कराड) याला अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेले आठही पंप जप्त केले.
--------
चौकट
शिरगाव पोलिस घेत होते शोध
चिपळूण तालुक्यातील तळसर येथील अक्षय उर्फ मिहीर अशोक गायकवाड हा तरुण बेपत्ता झाल्याची खबर त्याच्या कुटुंबीयांकडून शिरगांव पोलिस ठाण्यात २ सप्टेंबरला दिली होती. त्यानुसार शिरगांव पोलिस त्याचा शोध घेत होते; मात्र तोच चोरी प्रकरणात चिपळूण पोलिसांना सापडला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98478 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..