कुडाळ येथे मंगळवारी निबंध, वक्तृत्व स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळ येथे मंगळवारी 
निबंध, वक्तृत्व स्पर्धा
कुडाळ येथे मंगळवारी निबंध, वक्तृत्व स्पर्धा

कुडाळ येथे मंगळवारी निबंध, वक्तृत्व स्पर्धा

sakal_logo
By

कुडाळ येथे मंगळवारी
निबंध, वक्तृत्व स्पर्धा
कुडाळ, ता. २१ ः कोकणासाठीच नव्हे तर अखिल भारत वर्षाला भूषणावह असणारे संसदीय नेते बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेने विविध उपक्रम आयोजित करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेने जन्मशताब्दी वर्ष आणि बॅ. नाथ पै महिला बी.एड महाविद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (ता. २७) जिल्हास्तरीय खुल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.
निबंध स्पर्धा दुपारी अडीच ते साडेचार दरम्यान होणार आहे. स्पर्धेसाठी ‘थोर संसदपटू बॅ. नाथ पै’, ‘लोकनेते बॅ. नाथ पै’, असे विषय आहेत. शब्दमर्यादा १००० ते १२०० आहे. कार्यक्रमस्थळी हॉलमध्ये बसून निबंध लिहावयाचे आहेत. प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ३०००, २०००, १००० रुपये, प्रत्येकी बॅ. नाथ पै चषक व प्रमाणपत्र, तर दोन उत्तेजनार्थ ५०० रुपयांची बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘सामान्य जनतेचे कैवारी- बॅ. नाथ पै’ व ‘बॅ. नाथ पै आणि लोकचळवळ’, असे विषय असून वेळ सात मिनिटे आहे. स्पर्धा सकाळी दहाला सुरू होईल. प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ३०००, २०००, १००० रुपये, प्रत्येकी बॅ. नाथ पै चषक व प्रमाणपत्र, तर दोन उत्तेजनार्थ ५०० रुपयांची बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दोन्ही स्पर्धांतील सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. नावनोंदणी २६ पर्यंत बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, कुडाळचे प्रा. अरुण मर्गज, प्रा. परेश धावडे, प्रा. शांभवी आजगावकर-मार्गी यांच्याकडे करावी, असे आवाहन चेअरमन उमेश गाळवणकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98499 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..