टिके येथे आढळला घोणस कीडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टिके येथे आढळला घोणस कीडा
टिके येथे आढळला घोणस कीडा

टिके येथे आढळला घोणस कीडा

sakal_logo
By

rat21p18.JPG-
51648
रत्नागिरीः टिके येथे सौरभ गोविळकर यांना आढळलेला घोणस कीडा.

टिके येथे आढळला घोणस कीडा
कृषी तज्ज्ञांची माहिती; मनुष्याचा स्पर्श झाल्यास खाज सुटते
रत्नागिरी, ता. २१ः तालुक्यातील टिके येथे सौरभ गोविळकर यांच्या घराजवळील झाडावर घोणस कीडा आढळून आला आहे. त्याला स्पर्श झाल्यास खाज सुटत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे; मात्र तो दुर्मिळ नाही तर अनेक ठिकाणी तो सापडतो. हिरव्या पानावर लोकरीने विणलेली कलाकृती असावी असा तो दिसतो.
घराबाहेरील कुंडीत वेगळ्या प्रकारचा कीडा सौरभ गोविळकर यांना दिसला. त्यांनी निरीक्षण केले असता हिरव्या पानावर एखाद्या लोकरीने विणलेली कलाकृती असावी, असेच वाटत होते. प्रत्यक्षात जवळून पाहणी केल्यावर संपूर्ण पांढऱ्या रंगाचा हा वेगळ्या प्रकारचा कीडा असल्याचे दिसून आले. हालचाल केल्यामुळे हा वेगळ्या प्रकारचा कीडा असावा, असा अंदाज गोविळकर यांनी बांधला. उन्हामध्ये घेतलेल्या छायाचित्रात तो कीडा पिवळसर वाटत होता तर सायंकाळी काढलेल्या छायाचित्रात त्याचा रंग पांढराशुभ्र झाला होता.
आकर्षक कीडा रंग बदलणारा असावा, अशी शक्यता होती. याबाबत कृषिक्षेत्रातील तज्ज्ञांकडून माहिती घेतली असता त्यांनी घोणस कीडा असल्याचे सांगितले. मनुष्याच्या शरीराला त्याचा स्पर्श झाल्यास खाज सुटते. तो पतंगवर्गीय कीडा असून तो फार वेगाने फिरत नाही. या अळ्या त्यांच्या शरीराच्या गर्द आणि प्रखर तेजस्वी रंगाद्वारे आणि काटे किंवा केसांद्वारे त्याच्या भक्षकांना डंख मारतात. या किडीच्या काट्यांच्या दंशामुळे काही प्रमाणात त्रासही होऊ शकतो. ही अळी फारसे नुकसान करत नाही; परंतु काहीवेळा अळीचा प्रादुर्भाव काही ठराविक भागापुरताच मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि प्रादुर्भाव जास्त झाल्यास अळ्या फक्त पानांच्या शिरा सोडून बाकी भाग खातात.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98506 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..