गळ्यातील चैन लांबवताना तरुणीने महिलेला पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गळ्यातील चैन लांबवताना तरुणीने महिलेला पकडले
गळ्यातील चैन लांबवताना तरुणीने महिलेला पकडले

गळ्यातील चैन लांबवताना तरुणीने महिलेला पकडले

sakal_logo
By

गळ्यातील चेन लांबवताना
तरुणीने महिलेला पकडले
देवरुखातील प्रकार ; गुन्हा दाखल
देवरूख, ता. २१ः बसमध्ये चढत असताना तरुणीच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवताना महिलेला तरुणीने मोठ्या धाडसाने पकडून ठेवले. या चेन चोरीचा प्रकार बुधवारी (ता. २१) सकाळी ११.३० वाजता देवरूख आगारात घडला. अनघा अनंत जोशी (वय ६१, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) असे संशयित महिलेचे नाव आहे. या महिलेविरोधात देवरूख पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत देवरूख पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार निकीता उमेश सनगरे (वय २२, रा. सोनवडे वरचीवाडी, ता. संगमेश्वर) हिने चेन चोरीची फिर्याद दिली आहे. निकीता सनगरे ही तरुणी देवरुखात बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे टायपिंगचा क्लास आटोपून देवरूख आगारातून सकाळी ११.१५ वाजता सुटणाऱ्या देवरूख-काटवलीमार्गे संगमेश्वर बसने जाण्यासाठी देवरूख आगारात गेली. यावेळी बसमध्ये चढत असताना तिच्या पाठीमागे उभ्या असलेल्या एका महिलेने तिच्या गळ्यातील ७ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावली.
गळ्यातील चेन महिलेने हिसकावल्याचे लक्षात येताच निकीताने धाडस दाखवत त्या महिलेला पकडून ठेवले. चेन जमिनीवर पडली. ती चेन निकीताच्या ताब्यात देण्यात आली. चेन चोरीचा प्रकार घडल्यानंतर बस देवरूख पोलिसात नेण्यात आली. त्या महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. महिला पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्यानंतर तिची चौकशी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98507 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..