सुभाषनगरातून तरुणास ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुभाषनगरातून
तरुणास ताब्यात
सुभाषनगरातून तरुणास ताब्यात

सुभाषनगरातून तरुणास ताब्यात

sakal_logo
By

फोटो ५१९१२
51912
कोल्हापूर ः एनआयए-एटीएसच्या पथकाच्या कारवाईनंतर सुभाषनगर परिसरात गुरुवारी ठेवलेला पोलिस बंदोबस्त.
(नितीन जाधव ः सकाळ छायाचित्रसेवा)
०-------------

मुख्य बातमीचा मथळा
‘पीएफआय’विरुद्ध धडक कारवाई; १०६ अटकेत
---
कोल्हापूरसह देशभरात छापे
----------------------

सुभाषनगरातून
तरुणास ताब्यात
कोल्हापूर ः एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) आणि एटीएस (दहशतवादविरोधी पथक) यांनी संयुक्तरीत्या सुभाषनगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये छापा टाकून एका तरुणास ताब्यात घेतले. मध्यरात्री अत्यंत गोपनीयरीत्या ही कारवाई करण्यात आली. तो पीएफआय संघटनेशी संबंधित असल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, खबरदारीचा भाग म्हणून या परिसरात बंदोबस्त तैनात आहे. गेल्या काही दिवसांत ‘एनआयए’च्या या दुसऱ्या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली.
याबाबत पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः अतिरेक्यांशी संबंध आणि टेरर फंडिंगशी संपर्क असल्याच्या संशयातून एनआयए आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी देशभरात छापे घातले. त्यात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांबरोबरच कोल्हापुरातही कारवाई झाली. एनआयए आणि एटीएसचे पथक मध्यरात्री कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी कारवाईसंबंधीची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यास दिली. त्या पथकास स्थानिक पोलिसांची मदत देण्यात आली. मध्यरात्री तीनच्या सुमारास सुभाषनगरातील सिरत मोहल्ला परिसरातील एका अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटवर संबंधित पथकाने छापा टाकला. पथक संशयिताला ताब्यात घेऊन निघून गेले. या कारवाईची माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली. मात्र, सकाळी कारवाईची परिसरात चर्चा सुरू झाली, तशी बघ्यांनी गर्दी केली. त्यामुळे परिसरात दिवसभर बंदोबस्त तैनात होता.
सुभाषनगरातील ताब्यात घेतलेल्या तरुणाचे कुटुंब मूळचे कर्नाटकातील आहे. त्याचे वडील कामानिमित्त कोल्हापुरात आले आणि येथेच स्थायिक झाले. ते सध्या गांधीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्वतंत्र राहतात. त्या तरुणाचा जन्म कोल्हापुरातच झाला. त्याचे लग्न झाले असून, त्याला दोन मुले आहेत. तो गेल्या वर्षभरापासून सुभाषनगरातील सिरत मोहल्ला परिसरात आपल्या कुटुंबाबरोबर स्वतंत्र राहतो. तो पीएफआय संघटनेशी संबंधित असल्याचे तसेच तो जिल्हा कार्यकारिणीवरून राज्य कार्यकारिणीत जाण्याच्या तयारीत होता, अशी माहिती यापूर्वी तपासात पुढे आली असल्याचे समजते.

तासभर कारवाई...
एनआयएस आणि एटीएसच्या संयुक्त पथकाने पहाटे तीनच्या सुमारास कारवाईला सुरुवात केली. सुमारे तासभर कारवाई सुरू होती. पथकाने घराची झडतीही घेतल्याचे समजते. कारवाईची माहिती शेजाऱ्यांनाही समजली नाही, इतकी गुप्तता पाळण्यात आली होती.

स्थानिक पोलिसांच्या रडारावर...
विक्रमनगर परिसरात डिसेंबर २०२१ मध्ये एक आक्षेपार्ह पोस्टर लावल्या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली होती. त्यावेळी त्याने मोटारीवर डोके आपटून घेतले होते. पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रारही केली होती, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. तेंव्हापासून तो पोलिसांच्या रडारवरच होता, अशी भागात चर्चा सुरू होती.

अभियांत्रिकी शिक्षण...
तो सध्या ग्राफिक्स डिझाईनचे काम करतो. त्याने अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली आहे. तो वेगवेगळ्या सामाजिक कार्यातही सक्रिय असतो, अशी माहिती यापूर्वीच्या चौकशीतून पुढे आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दोन महिन्यांतील दुसरी कारवाई
‘एनआयए’च्या पथकाने जुलैमध्ये हुपरी परिसरात कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्यांना सोडूनही दिले होते. त्यापाठोपाठ आज झालेली ही दुसरी कारवाई जिल्ह्यात चर्चेची ठरली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98615 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..