रत्नागिरी ः न्यू इंग्लिश स्कूलचे गुणवंत दहा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः न्यू इंग्लिश स्कूलचे गुणवंत दहा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र
रत्नागिरी ः न्यू इंग्लिश स्कूलचे गुणवंत दहा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

रत्नागिरी ः न्यू इंग्लिश स्कूलचे गुणवंत दहा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

sakal_logo
By

-rat22p1.jpg- 51827 रत्नागिरी ः न्यू इंग्लिश स्कूल पाली प्रशालेचे यशस्वी विद्यार्थी व सोबत संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक.
-------
पाली स्कूलचे ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र
रत्नागिरी, ता. २५ ः राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे झालेल्या शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेतील गुणवत्ता यादीतील आलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तालुक्यातील पाली इंग्लिश स्कूलच्या ११ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशालेतर्फे सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी असे ः स्वराज मांडवकर (इतर मागास), कुणाल सावंत- अनुसूचित जाती, विशाल शिंदे- खुला, विनायक कोत्रे- इतर मागास, पार्थ चव्हाण- इतर मागास, श्रद्धा पवार- खुला आर्थिक मागास, शर्वरी मावळंकर- इतर मागास, समिधा गोरुले- इतर मागास, रिया कांबळे-अनुसूचित जाती, ऋतुजा सावंत- खुला आर्थिक मागास तसेच शुभम जावध या विद्यार्थ्यांना सारथी संस्थेकडून दरमहा ८०० रुपयाप्रमाणे नववी ते बारावीपर्यंत ३८ हजार ४०० रुपये शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. शिक्षक जाधव, पाटील, गोजारे, बोडेकर, आणि पाटील यांनी मार्गदर्शन केले होते. मुख्याध्यापिका रावराणे, पर्यवेक्षिका दळी यांच्या उपस्थितीत प्रशालेतर्फे विद्यार्थांचा सत्कार केला.