गणित परीक्षेत पाट हायस्कूलचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणित परीक्षेत पाट हायस्कूलचे यश
गणित परीक्षेत पाट हायस्कूलचे यश

गणित परीक्षेत पाट हायस्कूलचे यश

sakal_logo
By

swt222.jpg
51843
पाटः गणित संबोध परीक्षेत यश संपादन केलेल्या मुलांसमवेत शिक्षक वर्ग.

गणित परीक्षेत पाट हायस्कूलचे यश
कुडाळः एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस. एल. देसाई विद्यालय पाट, (कै.) सौ. सीताबाई रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय तसेच (कै.) डॉ. विलासराव देसाई उच्च महाविद्यालयातील पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. आठवीमधील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल लागला. सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले. यशस्वी विद्यार्थी अनुक्रमे असे ः सोहनी साळसकर, यश चव्हाण, जयेश निर्गुण. पाचवी ः साई वेंगुर्लेकर, सार्थकी फणसेकर, महेश्वरी राऊळ, आर्यन परब. संस्था कार्याध्यक्ष समाधान परब, सचिव सुधीर ठाकूर, संस्था सदस्य संजय ठाकूर, मुख्याध्यापक शामराव कोरे, पर्यवेक्षक राजन हंजनकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना प्रगती निवतकर, रमेश ठाकूर, विनायक कांबळे, एम. आर. सांगळे, नंदिनी बुरुड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
---------------
हुलावळे यांचे मनसेकडून स्वागत
कुडाळः येथील पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुडाळ तालुका पदाधिकाऱ्यांनी भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्ह्यात मोठ्या आस्थेने, भक्तिभावाने व निष्ठापूर्वक साजरा होणाऱ्या गणेशोत्सव काळात पोलीस प्रशासनाने अविरतपणे कार्यरत राहून कायदा सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था अतिशय उत्कृष्टपणे हाताळल्याबद्दल सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचेही मनसे पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, सचिव राजेश टंगसाळी, माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे, माजी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे, विभाग अध्यक्ष सुंदर गावडे, सचिन ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
--------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98622 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..