मंडणगड-विनोदी कलाकार चंद्रकांत मोडकले यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड-विनोदी कलाकार चंद्रकांत मोडकले यांचे निधन
मंडणगड-विनोदी कलाकार चंद्रकांत मोडकले यांचे निधन

मंडणगड-विनोदी कलाकार चंद्रकांत मोडकले यांचे निधन

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२२p५.jpg ःOP२२L५१८३१ मुंबई: आता उठवू सारे रान या नाटकातील एका प्रसंगी चंद्रकांत मोडकले.
------------
विनोदी कलाकार चंद्रकांत मोडकले यांचे निधन
मंडणगड, ता. २२ ः तालुक्यातील वडवलीचे हरहुन्नरी विनोदी अभिनेते चंद्रकांत मोडकले (५२) यांचे २१ सप्टेंबरला मुंबई येथे निधन झाले. त्यांच्यावर मुंबई कांदिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मोडकले यांनी वडवली गावांत सांस्कृतिक चळवळ उभी केली. अनेक नाटके, वगनाट्ये, नृत्याविष्कार कार्यक्रम यातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना रसिकांना खळखळून हसवत रंगमंच गाजवला. फ्रेंडस, बेबीचे लग्न, आता उठवू सारे रान, महाराष्ट्राचे मानकरी अशा अनेक प्रायोगिक व व्यावसायिक नाटाकांमधून विविध भूमिका त्यांनी साकारल्या होत्या. सध्या रंगमंचावर गाजत असलेल्या ‘आता उठवू सारे रान’ या नाटकातील त्यांनी नानांची भूमिका गाजवली. त्यांच्या मागे मुलगा, पत्नी व आई असा परिवार आहे. प्रवेशालाच टाळ्या घेणारा हरहुन्नरी विनोदवीर. एकदा स्टेजवर आले की, तो रंगमंच आणि समोरचा प्रेक्षकवर्ग हेच त्यांचं विश्व असायचं. तुफान हशा आणि टाळ्यानी रंगमंच दणाणून जायचा. आता उठवू सारे रान यामध्ये नाना त्यांनी असा काही अफलातून रंगवला की, हसवता हसवता प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणीपण आणलं. अचानक निघून गेल्याने बहरलेले रान ओसाड झाल्याची भावना दिग्दर्शक सुनील मांडवकर यांनी व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98632 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..