बॅडमिंटन संघात श्रुती फणसेची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॅडमिंटन संघात श्रुती फणसेची निवड
बॅडमिंटन संघात श्रुती फणसेची निवड

बॅडमिंटन संघात श्रुती फणसेची निवड

sakal_logo
By

साखरप्यात बांबू लागवड कार्यशाळा
साडवली ः चिपळूण वनविभागामार्फत जागतिक बांबूदिनानिमित्त वनपरिक्षेत्र रत्नागिरीमधील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील कबनूरकर हॉलमध्ये विभागीय वनाधिकारी दीपक खाडे यांच्या अध्यक्षतेखाली बांबू लागवड व उपयोग कार्यशाळा झाली. कार्यशाळेला माजी सभापती जया माने, प्रा. डॉ. अरविंद कुलकर्णी, बांबू सोसायटी अध्यक्ष काका कोलते, सरपंच बापू शेट्ये, विनायक गोवरे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, रामभाऊ आंब्रे, वनपाल तौफीक मुल्ला, वनरक्षक न्हानू गावडे आदी उपस्थित होते. बांबूरोपांचे पूजन करून व दीपप्रज्वलन करून पर्यावरण संवर्धनाची शपथ घेऊन कार्यशाळेला सुरवात करण्यात आली.
-----------
rat२२p२.jpg
५१८२८
रत्नागिरीः मुंबई विद्यापीठाच्या महिला बॅडमिंटन संघात निवड झालेल्या श्रुती फणसे हिचे अभिनंदन करताना नवनिर्माण शिक्षणसंस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, प्रा. सुकुमार शिंदे, सुशील सावळी आदी.
---
बॅडमिंटन संघात श्रुती फणसेची निवड
रत्नागिरी ः मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या बॅडमिंटन स्पर्धा चार विभागात घेण्यात आल्या. या विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विभागीय वुमेन्स बॅडमिंटन स्पर्धा देवरूख येथील एपीएस महाविद्यालयामध्ये झाल्या. या स्पर्धेमध्ये नवनिर्माण शिक्षणसंस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाचा महिला संघ कोकण विभागात सर्वोत्कृष्ट ठरला. या स्पर्धेमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांतून १३ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. या वेळी हेगशेट्ये महाविद्यालय महिला संघाने देवरूख, पिल्लई आणि ज्ञानदीप खेड संघांना हरवत अंतिम फेरीत दाखल झाला. अंतिम फेरीत कुडाळ कॉलेजविरुद्ध जबरदस्त फटकेबाजी करत हेगशेट्ये महाविद्यालयातील श्रुती फणसे, सायली चव्हाण, मैथिली सावंत आणि श्रावणी कांबळे यांच्या संघाने अव्वल स्थान पटकावले. फणसे हिची निवड मुंबई विद्यापीठाच्या संघासाठी करण्यात आली.
--------------
अन्वर जबले यांची निवड
चिपळूणः कालुस्तेखुर्द व मजरेकाशी ग्रुप ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून अन्वर जबले यांची सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जबले हे काँग्रेसचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. ते काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष म्हणून गेली काही वर्षे काम पाहत आहेत. ग्रुप ग्रामपंचायत कालुस्ते खुर्द व मजरेकाशीची ग्रामसभा नुकतीच झाली. या ग्रामसभेत जबले यांची निवड करण्यात आली.
------------
युनायटेड स्कूलमध्ये व्यवसाय मार्गदर्शन
चिपळूण ः युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण येथे व्यवसाय मार्गदर्शन विभागातर्फे एकदिवसीय व्यवसाय मार्गदर्शन परिषद घेण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे चिपळूणमधील सायकॉलॉजिस्ट स्नेहा साडविलकर उपस्थित होत्या. मोबाईलचा अतिरेक वापर, अभ्यासातील एकाग्रतेचा अभाव, बैठकीचा अभाव यामुळे मुलांच्या अध्ययनप्रक्रिया विस्कळीत होऊ लागली आहे. मुले मोबाईलचा वापर खूप करत आहेत, अभ्यास सवयीपासून खूप दूर गेले आहेत. मुलांच्या या विविध समस्या लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. उपमुख्याध्यापिका विना चव्हाण, स्वप्नाली पाटील उपस्थित होते.
---------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98636 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..