राजापूर-पाचलमध्ये स्वानंदयोग उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-पाचलमध्ये स्वानंदयोग उपक्रम
राजापूर-पाचलमध्ये स्वानंदयोग उपक्रम

राजापूर-पाचलमध्ये स्वानंदयोग उपक्रम

sakal_logo
By

पाचलमध्ये स्वानंदयोग उपक्रम
राजापूर, ता. २२ ः जीवनविद्या मिशन शाखा चारकोप यांच्यावतीने पाचल उपकेंद्र व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पाचल येथे ग्रामसमृद्धी अभियान राबवले जात आहे. त्या अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात असून त्याचाच एक भाग म्हणून स्वानंदयोग लेवल-१ हा फाउंडेशन कोर्स नुकताच झाला. या उपक्रमामध्ये विविध मान्यवरांनी मानवी जीवनाला एक नवा दिव्य दृष्टिकोन देण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला सरपंच अपेक्षा मासये, उपसरपंच आणि जीवनविद्या उपकेंद्र पाचलचे अध्यक्ष किशोर नारकर, माजी जिल्हा परिषद सदस्य आबा आडिवरेकर, ग्रामपंचायत सदस्य मनीषा बेर्डे, लांजा शाखेचे काशिनाथ चव्हाण, ग्रामविस्तार अधिकारी कांबळे, केंद्रप्रमुख सीताराम कोरगावकर, चारकोप शाखेचे वेतकर उपस्थित होते. शिबिरामध्ये कुडाळ येथील अद्वैत सावंत यांनी नैसर्गिक पद्धतशीर सुंदर व्यवस्था म्हणजे आपलं शरीर. त्याकडे पाहण्याची आपली दृष्टी कशी हवी, याबाबत सोप्या भाषेत मार्गदशन केले तर, मुंबई येथील निवेदिता धावडे यांनी मन म्हणजे काय, याची माहिती देताना आपल्या मनासारखं घडण्यासाठी कोणती युक्ती केली पाहिजे या संबंधित सविस्तर माहिती दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98637 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..