चिपळूण-पशुसंवर्धन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-पशुसंवर्धन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना
चिपळूण-पशुसंवर्धन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना

चिपळूण-पशुसंवर्धन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना

sakal_logo
By

पशुसंवर्धन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना

लम्पी रोग ; चिपळुणात अधिकाऱ्यांची बैठक
चिपळूण, ता. २२ ः जनावरांवरील लम्पी रोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. हा रोग तालुक्यात पसरू नये यासाठी पंचायत समितीने पशुसंवर्धन विभागाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत माहिती देताना तहसीलदार शेजाळ म्हणाले, लम्पी रोग कसा होतो? पशुपालकांनी कोणती काळजी घेणे गरजेचे आहे, याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. लम्पी हा विषाणूजन्य साथीचा त्वचारोग आहे. हा रोग मुख्यत्वे गायी व म्हशींमध्ये होतो. हा आजार चावणाऱ्या माशा, गोचिड, डास, चिलटे, पिसवा यांच्यामार्फत होतो. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हा रोग झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे पशुधन विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. चिपळूण तालुक्यात हा रोग अद्याप पसरलेला नाही; मात्र या आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चिपळूण तालुक्यातील 8 पशुवैद्यकीय रुग्णालयांत डॉक्टरांना सूचना करण्यात आल्या आहेत. तालुक्यात नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी उमा घारगेपाटील, सहाय्यक आयुक्त डॉ. कणसे, पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी बारापांत्रे यांचा समावेश आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98667 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..