खेड-वार्षिक सभा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-वार्षिक सभा उत्साहात
खेड-वार्षिक सभा उत्साहात

खेड-वार्षिक सभा उत्साहात

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat22p19.jpg ः KOP22L51894खेड ः श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभेत बोलताना शीतल पेठे.
--------
लक्ष्मीनारायण पतसंस्थेचा १० टक्के लाभांश
खेड, ता. २२ ः खेड शहरातील श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच लक्ष्मीनारायण देवस्थानच्या सभागृहात झाली. संस्थेचे अध्यक्ष शीतल पेठे यांनी संचालक मंडळ व सभासदांचे स्वागत करून या सभेला सुरवात केली. सर्व संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मेहनतीमुळे तसेच सभासदांच्या अखंड विश्‍वासामुळे स्थापनेपासूनच पतसंस्थेला अ वर्गाची परंपरा कायम राहिली आहे, असे पेठे यांनी सांगितले.
ठेवी, कर्ज व वसूल भागभांडवल व संस्थेच्या गुंतवणुकीत भरघोस वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षीही संस्थेने सभासदांना १० टक्के लाभांश अदा करणार असल्याचे सांगितले. संस्थेचे सभासद शांताराम मोहिते यांनी संस्थेच्या संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांनी कोविडच्या कालखंडातसुद्धा उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले. या वेळी पतसंस्थेच्या उपाध्यक्ष अंजली आघरकर, संचालक आबा जोशी, सुरेंद्र पराडकर, श्रीराम जोशी, सुनील मोघे, दत्तात्रय रेडीज, अपर्णा मोडक, पांडुरंग माने, गुणाजी खेडेकर, अमोल भागवत, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मोडक आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98729 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..