चिपळूण ः माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा वाढदिवस साधेपणाने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा वाढदिवस साधेपणाने
चिपळूण ः माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा वाढदिवस साधेपणाने

चिपळूण ः माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा वाढदिवस साधेपणाने

sakal_logo
By

फोटो ओळी
- ratchl223.jpg सदानंद चव्हाण KOP22L51896
---------
माजी आमदार सदानंद चव्हाणांचा आज वाढदिवस
चिपळूण, ता. २२ ः येथील माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा शुक्रवारी (ता. २३) वाढदिवस असून तो साधेपणाने साजरा केला जाणार असल्याची माहिती दिलीप चव्हाण यांनी दिली.
माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा गेल्या काही वर्षात मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला गेला. गेल्या अडीच वर्षात सेनेकडून चव्हाण दुर्लक्षित राहिले. यामुळे आगामी निवडणुका लक्षात घेता कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्यादृष्टीने माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी शिंदे गटात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर ते खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्यादृष्टीने काम करणार आहेत.
दरम्यान, शुक्रवारी चव्हाण यांचा वाढदिवस असून, त्यानिमित्त समर्थक कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहेत. बहादूरशेख नाका येथील संपर्क कार्यालयात ते कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार असल्याची माहिती दिली. येत्या काही दिवसातच मुख्यमंत्री शिंदे यांचा चिपळूण दौरा होणार असून हा दौरा यशस्वी होण्यासाठी चव्हाण समर्थक कार्यकर्ते जोरदार तयारी करत असून गावोगावी बैठका घेऊ लागले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98730 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..