पावस-नवरात्रोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-नवरात्रोत्सव
पावस-नवरात्रोत्सव

पावस-नवरात्रोत्सव

sakal_logo
By

गोळपमधील दुर्गादेवी मंडळातर्फे
सोमवारपासून नवरात्रोत्सव
पावस, ता. २२ः गोळपसडा साळवीनगर दुर्गादेवी नवरात्रौत्सव मंडळातर्फे नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. २६ सप्टेंबरला देवीचे आगमन होणार असून सकाळी १० वाजता ढोल-ताशांच्या गजरात देवीची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी ११.३० वाजता दुर्गादेवी नवरात्रौत्सव मंडळाचे अध्यक्षा निहा साळवी यांच्या हस्ते देवीची प्रतिष्ठापना होईल. २६ ते ३० ला रात्री साडेनऊ वाजता दांडिया रास होईल. २९ ला दुपारी १२ ते ४ या कालावधीत रांगोळी स्पर्धा (वयोगट १० ते १६ वर्ष) होणार असून त्यासाठी स्वातंत्र्याची ७५ वर्षे हा विषय आहे. रात्री १० वाजता भजनाचा डबलबारी होईल. ३० ला सायंकाळी ४ वाजता हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ५ होम मिनिस्टर स्पर्धा, १ ऑक्टोबरला सायंकाळी ४.३० वाजता जोगवा मागण्याचा कार्यक्रम, सायंकाळी ७.३० वाजता दिवटी नाचवण्याचा कार्यक्रम, रात्री साडेनऊ वाजता गोंधळाची कथा, २ ऑक्टोबरला रात्री साडेनऊ वाजता डान्स स्पर्धा, ३ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता होमहवन, कुवारीपूजन, रात्री ९.३० वाजता दांडियारास, ४ ऑक्टोबरला दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, रात्री ९.३० वाजता बक्षीस समारंभ, रात्री ११ वा. शक्तितुऱ्याचा जंगी सामना, ५ ऑक्टोबरला सायंकाळी ५.३० वाजता मंदिरामध्ये सोने वाटण्याचा कार्यक्रम, रात्री ९.३० वा. दांडियारास, ६ ऑक्टोबरला दुपारी ३.३० वाजता आरती, दुपारी ४ वाजता देवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात येईल. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावे, असे आवाहन मंडळ अध्यक्ष आनंद साळवी, उपाध्यक्ष गुरूनाथ झगडे केले आहे.
......
तुळसुंदेत १ ऑक्टोबरला झिम्मा फुगडी स्पर्धा
पावसः तुळसुंदे येथील किंजळादेवी युवामंडळातर्फे नाच गं घुमा.... झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन १ ऑक्टोबरला रात्री १० वाजता करण्यात आले आहे. विजेत्यांना अनुक्रमे ६ सहा, चार हजार आणि दोन हजार रुपये आणि चषक देण्यात येणार आहे. स्पर्धा सर्व महिला ग्रुपसाठी मोफत आहे. प्रत्येक संघाला सादरीकरणासाठी २० मिनिटांचा अवधी असेल. सहभागी प्रत्येक स्पर्धकाचा पेहेराव झिम्मा फुगडी नृत्यास साजेसा असावा. आपल्या सादरीकरणात गीतगायन व वादन स्वतः संघातर्फे केल्यास अधिक उत्तम. प्रथम येणाऱ्या संघांना प्राधान्य देण्यात येणार असून परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. स्पर्धा प्रवेशासाठी प्रसाद खडपे, नितू खरचकर, संकेत खडपे, योगेश खडपे यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98750 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..