मालवण जेटीवर लवकरच निवारा शेड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवण जेटीवर लवकरच निवारा शेड
मालवण जेटीवर लवकरच निवारा शेड

मालवण जेटीवर लवकरच निवारा शेड

sakal_logo
By

swt२२१९.jpg
51934
वैभव नाईक

मालवण जेटीवर लवकरच
निवारा शेडः वैभव नाईक
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २२ : येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग येथील जेटीवर सुमारे ३ कोटी रुपये खर्चून पर्यटकांसाठी निवारा शेड उभारण्यात येणार आहे. या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर शिवराजेश्वर मंदिरात सिंहासन बसविण्याची कार्यवाही लवकरच होईल, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी आज येथे दिली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षभरापूर्वी येथील किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली होती. या किल्ल्यास दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. किल्ल्यानजीक असलेल्या जेटीवर निवारा शेड नसल्याने पर्यटकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे जुन्या जेटीवर ज्याप्रमाणे निवारा शेड उभारण्यात आली आहे, तशीच निवारा शेड या जेटीवर उभारण्यात यावी, अशी मागणी पर्यटक, शिवप्रेमींकडून केली होती. त्यानुसार या जेटीवर निवारा शेड मंजूर झाली असून त्याची निविदा प्रक्रियाही झाली आहे. त्यामुळे किल्ल्यानजीकच्या जेटीवर निवारा शेड उभारण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे, असे आमदार नाईक यांनी सांगितले. किल्ल्यावर देशातील एकमेव शिवराजेश्वर मंदिर आहे. या मंदिरात सिंहासन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या कोल्हापूर येथे हे सिंहासन बनविण्याची कार्यवाही सुरू असून तेही लवकरच मंदिरात बसविण्यात येणार असल्याचे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98754 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..