साकेडी, आयनलच्या निवृत्त पोलिसपाटलांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साकेडी, आयनलच्या निवृत्त पोलिसपाटलांचा सत्कार
साकेडी, आयनलच्या निवृत्त पोलिसपाटलांचा सत्कार

साकेडी, आयनलच्या निवृत्त पोलिसपाटलांचा सत्कार

sakal_logo
By

51939
कणकवली : येथील पोलिस ठाण्यात निवृत्त पोलिसपाटलांचा सत्कार करताना पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर.


साकेडी, आयनलच्या निवृत्त पोलिसपाटलांचा सत्कार
कणकवली, ता.२२ : कणकवली तालुक्‍यातील साकेडी आणि आयनल या गावातील निवृत्त पोलिसपाटील यांचा आज पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी सत्‍कार केला. तसेच त्‍यांच्या कार्याचाही गौरव केला.
सत्‍कार झालेल्‍या निवृत्त पोलिसपाटील यांच्यामध्ये कासम इब्राहिम शेख (साकेडी) आणि दिलीप गणपत साटम (आयनल) यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे, उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, पोलिस कॉन्स्टेबल किरण मेथे, पोलिस सागर मासाळ आदी उपस्थित होते. गावपातळीवर गावातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यामध्ये पोलीस पाटील यांचे मोठे योगदान आहे.गावात घडणाऱ्या घडामोडींची माहिती वरिष्‍ठांना देणे. गावात कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस पाटील नेहमीच सतर्क असतात, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98762 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..