कोकणकन्या सुपरफास्टचे बुकिंग सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Railway
कोकणकन्या सुपरफास्टचे बुकिंग सुरू

कोकणकन्या सुपरफास्टचे बुकिंग सुरू

कणकवली : कोकण रेल्‍वे मार्गावर धावणाऱ्या कोकणकन्या एक्‍सप्रेसचा दर्जा वाढवून सुपरफास्ट करण्यात आल्‍यानंतर स्लीपर श्रेणीच्या तिकीटांत ३० रूपयांची वाढ झाली आहे. २० जानेवारी २०२३ पासून कोकणकन्या सुपरफास्ट नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. त्‍या गाडीच्या बुकिंगला आजपासून प्रारंभ झाला. कोकणकन्या या गाडीला २० जानेवारीपासून एक्‍सप्रेस श्रेणीतून सुपरफास्ट श्रेणीत बढती मिळणार आहे. त्‍यामुळे २० जानेवारीपासूनचे बुकिंग बंद ठेवले होते. आज (ता.२२) पासून २० जानेवारी आणि त्‍यापुढील तारखांचे बुकिंग सुरू करण्यात आले. यात स्लीपर श्रेणीच्या तिकीट दरात ३० रूपयांची वाढ झाली आहे.

पूर्वी कणकवली ते सीएसएमटी पर्यंत जाण्यासाठी ३४० रूपये द्यावे लागत होते. २० जानेवारी पासून याच प्रवासासाठी ३७० रूपये द्यावे लागणार आहेत. तर वातानुकुलीत थ्री टियरच्या आणि २ टियर दरात प्रत्‍येकी ४५ रूपये वाढ करण्यात आली आहे.कोकणकन्या ही गाडी १०१११ आणि १०११२ या क्रमांकासह धावते मात्र २० जानेवारी पासून हे क्रमांक २०१११ आणि २०११२ असे होतील अशी माहिती रेल्‍वे कडून देण्यात आली. सुपरफास्ट श्रेणीमध्ये समावेश झाल्याने कोकणकन्या एक्स्प्रेसच्या वेळापत्रकामध्येही बदल झाला आहे. मुंबईवरून मडगावसाठी निघणारी २०१११ ही कोकणकन्या एक्स्प्रेस सीएएसएमटी स्थानकातून रात्री ११.०५ वाजता निघेल. त्यानंतर ही गाडी दादर (११.१७), ठाणे (११.४५), पनवेल (१२.२५), रत्नागिरी (४.४५), वैभववाडी (६.१०), कणकवली (६.४२), सिंधुदुर्ग (७.००), कुडाळ (७.१२), सावंतवाडी (०७.३२), पेडणे (७.५६), थिवीम (८.१०), करमाळी (८.३२) आणि मडगाव (९.४६) येथे पोहोचेल.

सुपरफास्ट श्रेणी तरी सर्व थांबे कायम
कोकण कन्या एक्सप्रेस सुपरफास्ट झाल्यानंतर काही छोटे थांबे रद्द होणार असल्याची चर्चा होती. मात्र कोकण रेल्वेने याबाबत जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार आधीच्या कुठल्याही थांब्यामध्ये बदल झालेला नाही. मात्र रायगडमधील माणगाव येथील थांबा जो कोविड काळात रद्द झाला आहे तो मात्र सुपरफास्ट कोकणकन्या एक्सप्रेसच्या जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये रद्दच असल्याचे पाहायला मिळत आहे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98782 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kokanrailway