वैभववाडीत सरकारी जागेवर अतिक्रमण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैभववाडीत सरकारी जागेवर अतिक्रमण
वैभववाडीत सरकारी जागेवर अतिक्रमण

वैभववाडीत सरकारी जागेवर अतिक्रमण

sakal_logo
By

51956
वैभववाडी ः सरकारी भूखंडावर बांधकाम केलेल्या संरक्षण कठड्याला चिटकवलेली नोटीस.

वैभववाडीत सरकारी जागेवर अतिक्रमण

मुख्याधिकाऱ्यांकडून नोटीस; तातडीने बांधकाम हटविण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २२ ः येथील सार्वजनिक भूखंडावर सुरू असलेल्या संरक्षक कठड्याच्या बांधकामावरून वैभववाडीत वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून बांधकाम थांबवावे, अशी नोटीस वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज कांबळे यांनी बांधकाम केलेल्या भिंतीलाच चिकटविली आहे.
वाभवे-वैभववाडी नगरपंचायत कार्यालयानजीक सार्वजनिक प्रयोजनार्थ सरकारी भूखंड ठेवण्यात आला आहे. तालुक्यातील विविध संस्था, राजकीय पक्षाचे कार्यक्रम, सांस्कृतिक महोत्सव याच ठिकाणी होतात. भूमापन क्रमांक ३८/८ या भूखंडावर यापूर्वी स्टॉलरुपी अतिक्रमण झालेले आहे. दरम्यान, या भूखंडावर लावण्यात आलेल्या स्टॉलपैकी दोन स्टॉल हटविण्यावरून गेले दोन-तीन दिवस वैभववाडीतील वातावरण ढवळून निघाले आहे. या भूखंडामध्ये संरक्षक कठडा बांधण्याचे काम सुरू आहे. हे बांधकाम नेमके कोण करतेय, याची माहिती नगरपंचायतीला नाही. यासंदर्भात उलटसुलट प्रतिक्रिया आल्यानंतर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कांबळे यांनी आज या भूखंडावर सुरू असलेले अनधिकृत बांधकाम तत्काळ थांबविण्यात यावे आणि केलेले बांधकाम २४ तासांच्या आत निष्कासित करावे; अन्यथा नगरपंचायतीमार्फत बांधकाम हटविण्यात येईल. बांधकाम हटविण्याचा सर्व खर्च संबंधिताकडून वसूल करू, अशी नोटीस दिली आहे. याशिवाय अतिक्रमण हटाव कारवाईच्या वेळी होण्याऱ्या आर्थिक नुकसानीस सर्वस्वी संबंधित जबाबदार असेल, असे नोटिशीत नमूद आहे. दरम्यान, या नोटिसीमुळे खळबळ माजली आहे. वैभववाडीतील काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही नोटीस काढली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच भूखंडावर दुर्गादेवीची स्थापना केली जाते. त्यामुळे ऐन दुर्गोत्सवाच्या दोन-तीन दिवस अगोदर भूखंडावरील अतिक्रमणाचा वाद चव्हाट्यावर आला असून तो अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
................
कोट
वाभवे-वैभववाडी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील भूपान क्रमांक ३८/८ हा सरकारी भूखंड आहे. या भूखंडावर अनधिकृतपणे बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते हटविण्याबाबतची नोटीस दिली आहे. याशिवाय संबंधितांनी बांधकाम न हटविल्यास ते नगरपंचायतीमार्फत हटविण्यात येईल.
-सूरज कांबळे, मुख्याधिकारी, वाभवे-वैभववाडी नगरपंचायत

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98817 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..