दारू बाळगल्याप्रकरणी सावंतवाडीत महिलेवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारू बाळगल्याप्रकरणी सावंतवाडीत महिलेवर गुन्हा
दारू बाळगल्याप्रकरणी सावंतवाडीत महिलेवर गुन्हा

दारू बाळगल्याप्रकरणी सावंतवाडीत महिलेवर गुन्हा

sakal_logo
By

दारू बाळगल्याप्रकरणी
सावंतवाडीत महिलेवर गुन्हा
सावंतवाडी, ता. २२ः गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी बुधवारी रात्री ८ वाजता शहरातील जिमखाना लाखेवस्तीत राहणाऱ्या लक्ष्मी शंकर लाखे (वय ५७) यांच्यावर कारवाई करून तब्बल २० हजार १५७ रुपयांची दारू ताब्यात घेतली. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी या ठिकाणचा पदभार स्वीकारल्यानंतर शहरात अवैध धंद्याविरोधात मोहीम हाती घेतली आहे. शहरातील वस्तीमध्ये अवैध्यरित्या गोवा बनवण्याची दारू विकली जात असल्याबाबतची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत छापा टाकला. यावेळी तेथील लक्ष्मी लाखे हिच्याजवळ वेगवेगळ्या प्रकारची २० हजार १५० रुपयांची दारू सापडून आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98818 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..