दसऱ्यापर्यंत पडणार मुरुडचे बहुचर्चित साई रिसॉर्ट; किरीट सोमय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murud popular Sai Resort fall Dussehra Kirit Somayya
दाभोळ-दसऱ्यापर्यंत पडणार मुरुडचे बहुचर्चित साई रिसॉर्ट

दसऱ्यापर्यंत पडणार मुरुडचे बहुचर्चित साई रिसॉर्ट; किरीट सोमय्या

दाभोळ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या घोटाळ्याचे स्मारक मुरुड येथील साई रिसॉर्ट दसऱ्यापर्यंत जमीनदोस्त होईल, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दापोली दौऱ्यावेळी पत्रकारांना दिली. मुरुड येथील अनिल परब यांच्या रिसॉर्ट पाडण्याच्या कार्यवाहीबाबत पाठपुरावा करण्यासाठी सोमय्या गुरुवारी (ता. २२) दापोलीत आले होते.
ते म्हणाले,‘ तत्कालीन पालकमंत्री अनिल परब कोविड काळात मुरुड येथे रिसॉर्ट बांधत होते. सदानंद कदम यांनी चौकशीवेळी लिहून दिले आहे की, परब यांनी मला रिसॉर्ट विकले. याचाच अर्थ हे मूळ रिसॉर्ट अनिल परब यांचेच आहे. लाईट व कर लावण्यासाठी अनिल परब यांनीच अर्ज केला आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हाही लवकरच दाखल होईल, यासाठी जास्तीचे पुरावे आपण पोलिसांना दिले आहेत.

मुरुड येथील साई रिसॉर्टशेजारी असलेल्या सी काँच रिसॉर्टच्या मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला फरार म्हणून घोषित करावा, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे, असे सोमय्या यांनी सांगितले. तसाच गुन्हा अनिल परब यांच्यावरही दाखल करण्यात येईल. तीन वर्षापर्यंत या गुन्ह्यात जेल आहे. हे रिसॉर्ट बांधण्यासाठी पैसे कुठून आले याची चौकशी प्राप्तीकर विभाग व ईडीकडून करण्यात येत आहे. हे रिसॉर्ट पडले की त्याचीही चौकशी होईल, अशी माहिती सोमय्या यांनी दिली. या रिसॉर्टचे वीजबिल परब यांच्या नावाने येते. रिसॉर्ट सीआरझेडमध्ये बांधणे हा गुन्हा आहे. यामुळे हे भ्रष्टाचाराचे स्मारक दसऱ्याला तुटेल, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. या वेळी त्यांनी प्रांताधिकारी शरद पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता पटेल यांची भेट घेऊन साई रिसॉर्ट कारवाईसंबंधी माहिती घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98822 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..