देवरूख ः तरुणीची चेन चोरणाऱ्या महिलेला पोलिस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरूख ः तरुणीची चेन चोरणाऱ्या महिलेला पोलिस कोठडी
देवरूख ः तरुणीची चेन चोरणाऱ्या महिलेला पोलिस कोठडी

देवरूख ः तरुणीची चेन चोरणाऱ्या महिलेला पोलिस कोठडी

sakal_logo
By

चेन चोरणाऱ्या महिलेला पोलिस कोठडी

देवरुखातील घटना ; यापूर्वी केलेल्या गुन्ह्याचीही कबुली

देवरूख, ता. २२ ः देवरूख बसस्थानकात तरुणीची चेन चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला देवरूख पोलिसांनी अटक केली आहे. तिला गुरुवारी (ता. २२) सायंकाळी देवरूख न्यायालयात हजर करण्यात आले असता तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या महिलेने देवरूखमध्ये केलेल्या आणखी एका चेनचोरीच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
अनघा अनंत जोशी असे या महिलेचे नाव असून या महिलेला लांजातील एका गुन्ह्यात अटक झाली होती. हा गुन्हा सिद्ध होऊन तिला एक वर्षाची शिक्षादेखील झाली होती, अशी माहिती देवरूख पोलिसांनी दिली. या महिलेने याआधी संगमेश्वर तालुक्यातील काटवली येथील तृप्ती अशोक उबारे ही महाविद्यालयीन तरुणी देवरूख आगारात बसमध्ये चढत असताना तिच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. हा चोरीचा प्रकार २९ जुलैला घडला होता; मात्र या गुन्ह्यातील चोरीच्या मुद्देमालाचे तिने काय केले? याबाबत माहिती मिळू शकली नाही.
संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे येथील निकिता सनगरे ही तरुणी बुधवारी घरी जाण्यासाठी देवरूख बसस्थानकात बसमध्ये चढत असताना अनघा जोशी या महिलेने तिच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. हा तिचा प्रयत्न त्या तरुणीने हाणून पाडत तिला पकडून ठेवले होते. यानंतर या महिलेला देवरूख पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98823 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..