रत्नागिरी-कोकण रेल्वे मुद्रांकीकरणाचा काळ्याफिती लावून निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-कोकण रेल्वे मुद्रांकीकरणाचा काळ्याफिती लावून निषेध
रत्नागिरी-कोकण रेल्वे मुद्रांकीकरणाचा काळ्याफिती लावून निषेध

रत्नागिरी-कोकण रेल्वे मुद्रांकीकरणाचा काळ्याफिती लावून निषेध

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat२२p३२.jpg- KOP२२L५१९६५
रत्नागिरी ः येथील स्थानकावर निषेध करताना रेल कामगार सेनेचे सभासद.
-------
कोकण रेल्वे मुद्रांकीकरणाचा काळ्याफिती लावून निषेध
रेल कामगार सेना ; सर्व स्थानकांवरील कर्मचारी आक्रमक
रत्नागिरी, ता. २२ ः केंद्र सरकारने कोकण रेल्वेचे मुद्रांकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला रेल कामगार सेनेने विरोध दर्शविला असून गुरुवारी (ता. २२) कोकण रेल्वे मार्गावरील विविध स्थानकांवर काळ्याफिती लावून निषेध नोंदविण्यात आला.
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय मुद्रीकरण योजनेंतर्गत रेल्वे क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. २०२५ पर्यंतचे नियोजनही करण्यात आले आहे. यामध्ये कोकण रेल्वेचा ७४१ किलोमीटरचा ट्रॅक समाविष्ट करण्यात आला आहे. रेल्वे स्थानके, पॅसेंजर ट्रेनचे मुद्रीकरण करुन त्यामधून उत्पन्न मिळविण्यचा प्रयत्न केला जाणार आहे. कोकण रेल्वेचे मुद्रीकरण मूल्य अंदाजे सव्वासात हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. याला कोकण रेल्वेतील रेल कामगार सेनेने कडाकडून विरोध दर्शविला आहे. रेल संघटनेचे अध्यक्ष खासदार विनायक राऊत, कार्याध्यक्ष संजय जोशी आणि सरचिटणीस दिवाकर देव यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांवर काळया फिती लावून मुद्रांकिरण निर्णयाचा निषेध करण्यात आला. गुरुवारी सकाळी रत्नागिरीतील मुख्य स्थानकावर कर्मचारी एकवटले होते. स्थानकावर फलकही लावण्यात आला आहे. यावेळी सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजीही व्यक्त करण्यात आली. हा निर्णय केंद्र शासनाने रद्द करावा अशी मागणी यावेळी रेल कामगार सेनेचे नंदकिशोर सावंत, जनरल सेक्रेटरी राजू सुरती यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98843 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..