रत्नागिरी-रत्नागिरीत येणाऱ्या व्यापाऱ्याला लुटण्याचाच होता कट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-रत्नागिरीत येणाऱ्या व्यापाऱ्याला लुटण्याचाच होता कट
रत्नागिरी-रत्नागिरीत येणाऱ्या व्यापाऱ्याला लुटण्याचाच होता कट

रत्नागिरी-रत्नागिरीत येणाऱ्या व्यापाऱ्याला लुटण्याचाच होता कट

sakal_logo
By

51959 फोटो ओळी
-rat22p29.jpg-
रत्नागिरी ः खून झालेल्या त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानातील घटनास्थळाचा पंचनामा करताना शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी व अन्य सहकारी.
-------------

ठाण्यातील व्यापाऱ्याचा गळा आवळून खून
---
रत्नागिरीतील तिघांना अटक; संशयितांना सहा दिवसांची पोलिस कोठडी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ ः देणेकरी भागविण्यासाठी रत्नागिरीत येईल, त्या सोने-चांदीच्या व्यापाऱ्याला संपवून त्याला लुटायचे, असा कटच संशयितांनी रचला होता. ठाणे येथील व्यापारी त्यांच्या कटात अडकले आणि त्यांचा नाहक बळी गेल्याचे उघड झाले आहे. तीन संशयितांनी त्या व्यापाऱ्याचा त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानात गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेहाची मान आणि पाय एकत्र ओढून बांधले व मासेमारीच्या जाळ्यात तो मृतदेह गुरफटून गोणीत भरला. त्यानंतर रिक्षातून आबलोली येथील खाडीत टाकल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.
भूषण सुभाष खेडेकर (वय ४२, रा. दत्तमंदिरसमोर, खालची आळी, रत्नागिरी), महेश मंगलप्रसाद चौगुले- रिक्षाचालक (३९, रा. मांडवी सदानंदवाडी, रत्नागिरी), फरीद महमूद होडेकर (३६, रा. खोतवाडी-भाट्ये, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. कीर्तिकुमार अजयराज कोठारी (५५, रा. भाईंदर, ठाणे) असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १९) रात्री त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानात घडली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तीन दिवसांत या गुन्ह्याचा उलगडा केला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः ठाण्यातील सोने-चांदीचे व्यापारी कीर्तिकुमार कोठारी हे रत्नागिरीत व्यापारासाठी आले होते. मात्र, सोमवारी रात्री ते बेपत्ता झाल्याची तक्रार करण कीर्तिकुमार कोठारी (वय ३२, रा. इंदिरा कॉम्प्लेक्स, ६० फुटी रोड, भाईंदर पश्चिम, जि. ठाणे) यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली. कोठारी मुक्कामाला श्रद्धा लॉजला होते. परंतु, ते परत गेलेच नाहीत. त्यांच्याशी संपर्कही होत नव्हता व मोबाईल फोनही स्वीचऑफ येत होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. कोठारी यांचे नातेवाईक रत्नागिरीत आले. वडिलांच्या संपर्कातील ज्वेलर्सकडून माहिती घेऊन चौकशी करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये वडील त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानात सोमवारी रात्री साडेआठला गेले, ते पुन्हा बाहेर आले नसल्याचे लक्षात आले.
पोलिसांनी केलेल्या तपासात त्रिमूर्ती ज्वेलर्सचा मालक संशयित भूषण खेडकर, महेश चौगुले आणि होडेकर यांनी दुकानात कीर्तिकुमार यांचा गळा दाबून त्यानंतर रस्सीने गळा आवळून खून केला. मृतदेह तिथेच ठेवला आणि रात्री एकनंतर चौगुले याच्या रिक्षात भरून गुहागर तालुक्यातील आबलोली येथे खाडीत टाकल्याचे निष्पन्न झाले. संशयित अनेकांचा देणेकरी आहे. तसेच, अन्य साथीदार होडेकर हा व्याजाचा व्यवसाय करीत असल्याचे समजते. दोघांनाही पैशांची गरज होती. देणेकरांना भागविण्यासाठी रत्नागिरीत सोने-चांदीचा जो कोण व्यापारी येईल, त्याला गेम करून दागिने लुटण्याचा त्यांचा कट होता. काही दिवसांपूर्वी अन्य एका व्यापाऱ्याला त्यांनी लक्ष केले होते. त्याच्या सुदैवाने खेडेकर याने फोन करूनही तो त्याच्याकडे गेला नाही. त्यामुळे तो वाचला. मात्र, कोठारी गेले आणि त्यांना जीव गमवावा लागला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी क्रूरपणे त्याला बांधून पाण्यात टाकले. आज रात्री मृतदेह सापडला. तिन्ही संशयितांना आज न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
--------------

चौकट-

केवळ दीड लाखाच्या चांदीसाठी खून
कोठारीकडे बक्कळ माल मिळेल, या अपेक्षेने तिन्ही संशयितांनी त्याला दुकानात बोलावले होते. मात्र, कोठारी यांच्याकडे केवळ सव्वा ते दीड लाखाचीच चांदी आणि काही रोकड होती. कोठारींचा खून केल्यावर जेव्हा त्याची झडती घेतली, तेव्हा त्याच्याकडे केवळ सव्वा ते दीड लाखाची चांदी मिळाली. तो मुद्देमालही संशयितांनी विकल्याचे समजते. त्यामुळे ज्या उद्देशाने हा खून करण्यात आला, तो पूर्ण फसल्याचे तपासात पुढे आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98846 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..