व्हेलची २२ कोटींची उलटी देवगडात जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हेलची २२ कोटींची 
उलटी देवगडात जप्त
व्हेलची २२ कोटींची उलटी देवगडात जप्त

व्हेलची २२ कोटींची उलटी देवगडात जप्त

sakal_logo
By

51980
देवगड ः येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने माशाची उल्टी जप्त केली.

व्हेलची २२ कोटींची
उलटी देवगडात जप्त
दोन महिलांसह सहा जण रडारवर
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २२ ः येथे पवचनचक्की परिसरात व्हेल माशाची उलटी (अंबरप्रोल) ची तस्करी करणाच्या तयारीत असलेल्या सहा संशयितांवर ओरोस येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या दराप्रमाणे या पदार्थाची किंमत सुमारे २२ कोटी ३७ लाख इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी एकूण सहा जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, दोन महिलांचाही समावेश आहे. याबाबत येथील पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दिलेली माहिती अशी व्हेल माशाच्या उल्टीची तस्करी होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे शाखेचे सहायक निरीक्षक महेंद्र घाग यांना मिळाली होती. खातरजमा करून कारवाईचे आदेश प्रभारी अधिकारी संदीप भोसले यांनी दिले. त्यानंतर पथकाने पवनचक्की उद्यानासमोर सापळा रचला. सहा जणांना ताब्यात घेतले. तपासणीमध्ये त्यांच्याकडे व्हेल माशाची सुमारे २२ किलो ३७० ग्रॅमची उल्टी आढळली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या दराप्रमाणे त्याची किंमत सुमारे २२ कोटी ३७ लाख इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयिताकडून मोटार, दुचाकीही जप्त केली आहे. कारवाईत हवालदार आशिष गंगावणे, अनुपकुमार खंडे, अनिल धुरी, प्रमोद काळसेकर, हवालदार रूपाली खानोलकर, पोलिस नाईक अमित तेली, संकेत खाड्ये, काँस्टेबल रवी इंगळे, प्रथमेश गावडे, यशवंत आरमारकर यांनीही भाग घेतला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98867 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..